महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठमोळा सण; नववर्षाच्या स्वागतासाठी गिरगाव सज्ज - celebrate

पारंपरिक वेषाभूषेतील दुचाकीस्वार महिलांचे आदिशक्ती पथक, युवकांचे युवाशक्ती पथक, गिरगाव कलामंच तर्फे नयनरम्य संस्कार भारती रांगोळी त्याच प्रमाणे रंगशारदा तर्फे रांगोळ्यांच्या पायघड्या , यात्रेच्या शेवटी यात्रेदरम्यान होणारा कचरा स्वच्छ करणारे संत गाडगेबाबा स्वच्छता पथक ही प्रतिवर्षीप्रमाणे यात्रेची वैशिष्ट्ये असणार आहेत.

नववर्षाच्या स्वागतासाठी गिरगांव सज्ज

By

Published : Apr 6, 2019, 8:52 AM IST

Updated : Apr 6, 2019, 3:35 PM IST

मुंबई - स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही गिरगावातील फडके गणेश मंदिरापासून निघणारी ‘हिंदू नववर्ष स्वागत यात्रा’ अर्थात ‘गिरगावचा पाडवा’ मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. यात्रेचे हे १७ वे वर्ष आहे. या वर्षीची यात्रा ‘ज्योतीने तेजाची आरती’ या संकल्पनेवर आधारित आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी गिरगांव सज्ज


यात्रेचा प्रारंभ सकाळी ८ वाजता गिरगांवातील फडके गणेश मंदिरापासून गुढी पूजनाने होणार आहे. मूर्तिकार योगेश इस्वलकर यांनी साकारलेल्या २२ फूट उंच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हातात यात्रेची मुख्य गुढी असेल. पर्यावरण रक्षणाचा विचार करून ही प्रतिकृती याहीवर्षी कागदाचा वापर करून बनवण्यात येणार आहे. आझाद हिंद सेनेने स्थापिलेल्या आझाद हिंद सरकारला ७५ वर्षे यावर्षी पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोसांची प्रतिकृती बनविण्यात आली आहे. मूर्तिकार प्रदीप मादुस्करांनी साकारलेली वैभवसंपन्न गणेशाची मूर्ती यात्रेच्या अग्रस्थानी असेल. गिरगांवातील महिला व युवती या गणपती समोर अथर्वशीर्षचे पठण करणार आहेत. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे प्रभू श्रीराम यांच्यासमोर रामकथा गायन करणारे लव-कुश यांचा जिवंत देखावा यात्रेची शोभा वाढविणार आहे. स्वामी समर्थांची पालखी व अखंड नामस्मरणसुद्धा भक्त संप्रदायातर्फे असणार आहे. महाराष्ट्राच्या लोककलेच्या समृद्ध परंपरेचे सादरीकरणही यात्रेत करण्यात येणार आहे.


पारंपारिक वेषातील दुचाकीस्वार महिलांचे आदिशक्ती पथक, युवकांचे युवाशक्ती पथक, गिरगांव कलामंच तर्फे नयनरम्य संस्कार भारती रांगोळी त्याच प्रमाणे रंगशारदा तर्फे रांगोळ्यांच्या पायघड्या , यात्रेच्या शेवटी यात्रेदरम्यान होणारा कचरा स्वच्छ करणारे संत गाडगेबाबा स्वच्छता पथक ही प्रतिवर्षीप्रमाणे यात्रेची वैशिष्ट्ये असणार आहेत. प्रसिद्ध कलादिग्दर्शक तुषार कोळी यांनी साकारलेला प्रतापगड व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवरील देखावा ही यात्रेत सर्वांचे लक्ष वेधून घेईल.


गेली अनेक वर्षे गिरगांवकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले गिरगाव ध्वजपथक व गजर ढोल पथकही यात्रेत सामील होत आहे. या पथकातील सुमारे १००० युवक, युवती गेले महिनाभर कसून सराव करीत आहेत. गिरगाव ध्वजपथक या वर्षी झांज पथक, २०० तरुण तरुणींचे ध्वजधारी पथक आणि यावर्षी नाविन्यपूर्ण बर्ची पथक घेऊन सहभागी होणार आहे. उदय देशपांडे सरांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ व्यायाम मंदिर, शिवाजी पार्क यांच्या तर्फे मल्लखांबाची आणि रोप मल्लखांबाची प्रात्यक्षिके यात्रेदरम्यान दाखविण्यात येणार आहेत. या मेळाव्यात कापरेश्वर मार्ग मंडळातर्फे सावत्रीबाई फुले यांनी सुरु केलेली शिक्षण परंपरा, पुंडलिकाची विठ्ठलावर भक्ती, वारकरी संप्रदाय, प्रभू रामांनी सुरु केलेली गुढीपाडव्याची परंपरा, भारतमातेला मानवंदना देतानाचे भारतीय सशस्त्र सेना दल व पोलीस दल या सर्व विषयांवर देखावे असतील असे जाहीर करण्यात आले. विंग कमांडर अभिनंदन यांच्या वर गिरगाव प्रतिष्ठानचा देखावा, इस्कोन मंदिरातर्फे जगन्नाथ रथ यात्रेचा देखावा, अमरजवान ज्योतीला मानवंदना देतानाचे आरएसपी युनिट या सर्व विषयांवर देखावे असतील. गिरगाव रजक संघ व महाराष्ट्र तेलुगु कल्चरल असोसिअशन बतुकम्मा आणि बोनालू यांच्यावर देखावे सादर करणार आहेत. राष्ट्रीय स्तरावर गाजलेली एफ १ स्टुडंट कार यात्रेत आपले वेगळेपण दाखवून जाणार आहे.

Last Updated : Apr 6, 2019, 3:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details