महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Marine Drive : मौसम मस्ताना तो क्या करे; हायटाईड असताना देखील मुंबईकर मरीन ड्राईव्हला

मुंबईत पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता असताना, हवामान विभागाच्या सूचनेनंतर देखील अनेक मुंबईकर मरीन ड्राईव्ह येथे पावसाचा आनंद घेण्यासाठी फिरायला आल्याचे पाहायला मिळाले. 'मौसम मस्ताना तो क्या करे' अशी काहीशी अवस्था या मुंबईकरांची आहे.

Marine Drive
मरीन ड्राईव्ह

By

Published : Jul 21, 2023, 7:23 PM IST

Updated : Jul 21, 2023, 9:10 PM IST

माहिती देताना प्रतिनिधी

मुंबई : काही तासांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबई, उपनगरे आणि मध्य मुंबईत आज पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई केंद्राने येत्या २४ तासात शहर आणि उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच 50-60 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


सरासरी पावसाची नोंद :मुंबईत गेल्या 24 तासात सरासरी 100 मिमी पाऊस झाला आहे. येत्या काही तासांत शहर आणि उपनगरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. तर, गुरुवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाला होता, सोबतच शहरातील काही भागात पाऊस झाला नाही. गुरुवारी मागच्या 24 तासांच्या कालावधीत शहरात सरासरी 100 मिमी पाऊस झाल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या कालावधीत शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये अनुक्रमे 95.39 मिमी, 96.70 मिमी आणि 110.45 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे.



प्रशासनाकडून केले आवाहन: भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुंबई केंद्राने पुढील २४ तासांत, शहर आणि उपनगरांमध्ये 50-60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा सोबतच मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



मुसळधार पावसाचा इशारा: मुंबई सोबतच भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याचा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा इशारा, प्रशनानाकडून देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, आयएमडीने येत्या सोमवारपर्यंत घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. घाट प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्यामुळे अतिसंवेदनशील भागात पाणी साचणे, तसेच अचानक पूर येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा -

  1. Sunday Music Street Mumbai : संडे मॉर्निंगसाठी मरीन ड्राईव्ह बनले संगीताचे डेस्टिनेशन; पाहा व्हिडिओ
  2. Sunday Street : रविवारच्या सकाळी मुंबईकरांनी लुटला संगीताचा मनमुराद आनंद ; मरीन ड्राईव्ह येथे संडे स्ट्रीट
Last Updated : Jul 21, 2023, 9:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details