मुंबई : मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांचे खूप हाल झाले. पहिल्याच पावसात अशी अवस्था झाल्यानं पुढे मुसळधार पावसात काय होणार? अशी काळजी मुंबईकर उपस्थित करत आहे. याचदरम्यान रविवारी सकाळी भीषण घटना घाटकोपरमध्ये घडली आहे. घाटकोपर परिसरात असलेल्या राजवाडी रुग्णालय नजीक बंगलो रोडवर बंगल्याचा काही भाग कोसळला आहे. या इमारतीत अडकलेल्या दोन जणांची सुटका करण्यात आली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या माय-लेकाची सुटका करण्यात आली. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दोन मजली बंगल्याचा भाग कोसळला :या अपघातात दोन जण अडकून पडले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफने बचावकार्य केले. या दुर्घटनेत एकूण चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जखमींना नजिकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. राजावाडी रुग्णालय परिसरात असलेल्या दोन मजली बंगल्याचा काही भाग कोसळला. या घटनेत काही व्यक्ती अडकल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत 94 वर्षीय अलका पालांडे ही वृद्ध महिला आणि नरेश पालांडे हा एक पुरुष ढिगाऱ्याखाली अडकले. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल होत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
दोन जण ढिगाराखाली अडकले : अलका पालांडे यांचे नातेवाईक शरद पालांडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना माहिती दिली की, दुमजली बंगला असून खाली बेसमेंटमध्ये कार पार्किंगसाठी जागा होती. तीन कुटुंब या बंगल्यात राहत असून तळमजल्यावर राहत असणारे अलका आणि त्यांचा मुलगा नरेश पालांडे हे ढिगाराखाली अडकले आहेत. इतर पाच-सहा अडकलेल्या लोकांना बाहेर काढले असल्याची माहिती देखील शरद पालांडे यांनी पुढे दिली आहे.
मालकाविरोधात तक्रार करणार : एनडीआरएफचे जवान आणि अग्निशमन दलाचे जवान ढिगाराखाली अडकलेल्या अलका आणि नरेश यांना शोधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पालांडे कुटुंबीय या बंगल्यात भाडेतत्त्वावर राहतात. हा बंगला ठाण्यातील एका राजकीय व्यक्तीच्या मालकीचा असल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पिटल नजीक असलेल्या परिसरातील बरेच बांधकाम बेकायदेशीर असून गेली तीस वर्ष महापालिकेने ऑडिट केले नसल्याचे देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे पालांडे कुटुंबीयांचे नातेवाईक टिळक नगर पोलीस ठाण्यात बंगल्याच्या मालकाविरोधात तक्रार करणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.पहिल्याच पावसात मुंबईत इमारतीची दुर्घटना समोर आली आहे. इमारत दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, अधिकाऱ्याने सांगितले. या इमारतीत काही रहिवासी अद्याप अडकले आहेत.