कोल्हापूर: भारतीय हवामान विभागाने कोल्हापूरला आज यलो अलर्ट दिला आहे. कोल्हापूरमध्ये कमी पाऊस झाल्याने गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी नोंद आहे. दुसरीकडे मुंबई उपनगरात पावसाच्या हलक्या सरी झाल्या आहेत. येत्या ६ दिवस समुद्राला उधाण येणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात 5 जुलै रोजी मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. 3, 4 मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात 5 जुलैला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढचे तिन्ही दिवस पाऊस मध्यम स्वरुपाचा राहण्याचा अंदाज आहे.
जून महिना उलटला तरी म्हणावासा पाऊस न बसल्याने पाणीदार कोल्हापूर जिल्ह्याचे पाण्याचे नियोजन कोलमडले आहे.अर्धा जून महिना गेला तरी पाऊसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्याचे दिसून आले. धरणही कोरडे पडले आहेत. मात्र २२ जूनला जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र दमदार पाऊस न झाल्याने जून महिन्यात सरासरी ९३ मिलीमिटर पाऊसाची नोंद झाली आहे. ही गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी पाऊसाची नोंद आहे.
काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस:कोल्हापूर जिल्ह्यात जून शेवटला दाखल झालेल्या मान्सूनने गेल्या 4 ते 5 दिवसांपासून ग्रामीण भागात आपला जोर वाढला असून गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी तर राधानगरी, शाहुवाडी तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे कोरड्या पडलेल्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यात झालेल्या कमी-अधिक पावसाने पिके तरली आहेत. तर काही भागात पावसामुळे खोळंबलेल्या पेरण्यांनाही सुरूवात झाली आहे. तर पेरणी झालेल्या पिकांना खताचा डोस देण्याची लगबग ग्रामीण भागात पहायला मिळत आहे. राधानगरी, चंदगड, शाहूवाडी तालुक्यात पावसाचा जोर असला तरी त्या तुलनेत अन्य शिरोळ, हातकणंगलेसह अन्य तालुक्यात प्रमाण कमी असून दमदार पावसाची प्रतीक्षा सुरू आहे.
गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात झालेला पाऊस
- हातकणंगले: 173.9 मिलीमीटर
- शिरोळ:117.4 मिलीमीटर
- पन्हाळा:587.7 मिलीमीटर
- शाहुवाडी:685 मिलीमीटर
- राधानगरी: 1445.2 मिलीमीटर
- गगनबावडा:1929.6 मिलीमीटर
- करवीर:317.8 मिलीमीटर
- कागल: 246 मिलीमीटर
- गडहिंग्लज: 289.6 मिलीमीटर
- भुदरगड: 526.9 मिलीमीटर
- आजारा:750.9 मिलीमीटर
- चंदगड:10101.2 मिलीमीटर
गत पाच वर्षांतील सर्वात कमी पाऊस-जून महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात केवळ 93 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 5 वर्षातील ही सर्वात कमी पाऊसची नोंद आहे. 2019 साली जेव्हा कोल्हापूरला महापुराचा सामना करावा लागला. त्यावेळी जून महिन्यात सरासरी355 मिलीमीटर तर 2022 मध्ये 290 मिलीमीटर, 2021 मध्ये 399 आणि 2022 मध्ये 207 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जर पावसाने दमदार हजेरी लावली तर ऑगस्ट अखेरपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात 24 तासात एकूण 685.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोल्हापूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.तर 5 जुलैपर्यंत तुरळक पाऊस असेल. पण 5 जूलैनंतर कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठी टीएमसीमध्ये ( कंसात गेल्यावर्षी 1 जुलैचा साठा) - राधानगरी - 1.99 (2.30 )
- वारणा - 11.13 (10.52)
- काळम्मावाडी- 1.54 (6.24)
- कासारी - 0.67 (0.94)
- कडवी- 0.80 (0.74)
- कुंभी - 0.91 (1.07)
- पाटगांव - 0.89 (1.26)
हेही वाचा-
- Mumbai Rains : मुंबईत पावसाचा जोर कायम, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा; पालिकेच्या आकडेवारीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू
- Weather Today: मान्सूनच्या आगमनानंतर मुंबईत विविध घटनांत दहा जणांचा मृत्यू, 3 जिल्ह्यांना आयएमडीचा ऑरेंज अलर्ट