मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे. मुंबई आणि पश्चिम उपनगर भाग म्हणजे जोगेश्वरी, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, विलेपार्ले आणि वांद्रे भागात आजही मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी तुंबले आहे. एवढेच नाही तर मुसळधार पावसामुळे येथील वाहनांची वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली आहे. हवामान खात्याने मुंबई आणि आसपासच्या भागांसाठी गुरुवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
अलर्ट जारी :भारतीय हवामान विभागाकडून आधी यलो अलर्ट जारी करण्यात आला, नंतर ऑरेंज अलर्ट सांगण्यात आला. मात्र, बुधवारच्या तुलनेत गुरुवारी मुंबई आणि परिसरात फारसा पाऊस झालेला नाही. परंतु आतापर्यंत झालेल्या पावसात बीएमसीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये भायखळ्यामध्ये 1, मालाडमध्ये 1, गोरेगावमध्ये 1 अशा तीन लोकांचा झाड पडल्याने मृत्यू झाला आहे. घाटकोपर 2 आणि विलेपार्ले येथे इमारत कोसळून एकूण जणांचा मृत्यू झाला आहे. गोवंडीत 2 आणि कांदिवलीत 1 जण नाले सफाईच्या कामात 1 असे मृत्यू झाले आहेत.
Mumbai Rains : मुंबईत पावसाचा जोर कायम, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा; पालिकेच्या आकडेवारीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू - भारतीय हवामान विभाग
पावसाने मुंबईत कहर केला आहे. आतापर्यंत 10 जणांचा पावसामुळे मृत्यू झाला आहे. बीएमसीचा हा आकडा समोर आला आहे. बुधवारी झालेल्या पावसात एक इमारत कोसळली. काही ठिकाणी झाडे पडली, ठिकठिकाणी पाणी तुंबले, वाहतूक मंदावली आहे. जनजीवन पूर्णपणे अस्ताव्यस्त झाले आहे.

मान्सूनने घेतला 10 जणांचा बळी : अशा प्रकारे मुंबईत झाड पडल्याने एकूण 3 जणांचा मृत्यू झाला असून इमारत कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. नाला सफाई करताना ३ मजुरांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे देशाच्या आर्थिक राजधानीत मान्सूनने 10 जणांचा बळी घेतला आहे. बुधवारच्या पावसातच 2 जणांचा मृत्यू झाला आहे. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मालाड येथील कौशल देवी (वय ३८) आणि गोरेगाव येथे लॉन्ड्री चालवणारे प्रेमलाल निर्मल (वय ३०) यांचा बुधवारी झाड अंगावर पडून मृत्यू झाला. एका ऑटोरिक्षा चालकावर झाड पडल्याने तो गंभीर जखमी झाला.
हेही वाचा :
- Mumbai Rains: मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस; पाहा अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या सब वेमध्ये साचले पाणी
- Weather Today: मुंबई उपगनरात पावसाचा जोर वाढला, पुढील ३-४ तासांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज
- mumbai rain : मान्सूनच्या पावसाची सुरुवात होताच थिरकले मुंबईकर, कुठे खेळला गरबा तर कुठे तुंबईमुळे नागरिकांची तारांबळ