मुंबई - मान्सूनचे आगमन होण्यासाठी काही दिवस उरले आहे. यामुळे पावसाळ्या दरम्यान मुंबईत गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी लक्षात घेऊन आपत्कालीन परिस्थिती, रेल्वे स्थानकातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरपीएफ जवान व महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाच्या एकूण ७०० जवानांना रेल्वेकडून खास प्रशिक्षण दिले जात आहे.
पावसाळ्यात रेल्वे स्थानकातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरपीएफच्या जवानांना विशेष प्रशिक्षण
एल्फिस्टन येथे झालेल्या दुर्घटनेनंतर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आरपीएफ जवान व महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाच्या एकूण ७०० जवानांना रेल्वेकडून खास प्रशिक्षण दिले जात आहे. पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वेच्या टप्यातील २३रेल्वे स्थानकावर यावेळी विशेष काळजी घेतली जाणार आहे.
एल्फिस्टन येथे झालेल्या दुर्घटनेनंतर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आरपीएफ जवान व महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाच्या एकूण ७०० जवानांना रेल्वेकडून खास प्रशिक्षण दिले जात आहे. पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वेच्या टप्यातील २३ रेल्वे स्थानकावर यावेळी विशेष काळजी घेतली जाणार आहे. पश्चिम रेल्वेची १० रेल्वे स्थानक असून मध्य रेल्वेची १३ रेल्वे स्थानक आहेत. यातील मध्य रेल्वेच्या मार्गावर १३ रेल्वे स्थानकात आरपईएफ चे ५५० आणि एमएसएफ चे २५१ असे एकूण ८०१ जवान सुरक्षेसाठी तैनात असणर आहेत.
पश्चिम रेल्वेच्या बांद्रा, दादर, अंधेरी, जोगेश्वरी, बोरीवली, भाईंदर, सांताक्रूज, मालाड, वसई रोड आणि विरार, या स्थानकांवर तर मध्य रेल्वेच्या मस्जिद बंदर, चिंचपोकळी, करी रोड, परेल, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा , अंबरनाथ व बदलापुर या स्थानकावर पावसाळ्यात अधिक गर्दी होत असल्या कारणाने या ठिकाणी सुरक्षा रक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.