महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वेने उभारले गर्डर - कुर्ला ते टिळक नगर दरम्यान जलमार्गाचे रुंदीकरण

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने हार्बर मार्गावरील टिळक नगर येथील जलमार्गासाठी नाले रुंदीकरणाचे काम हाती घेतले. कुर्ला ते टिळक नगर दरम्यान विद्यमान प्री-स्ट्रेस्ड स्लॅब पूल 4.5 मीटर स्पॅनचा असून ब्राह्मणवाडी नाल्याला जोडलेला आहे. पावसाळ्यात वाहणार्‍या जलमार्गाच्या वहनासाठी अतिरिक्त बॉक्स टाकण्यात आले.

रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वेने उभारले गर्डर
रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वेने उभारले गर्डर

By

Published : May 13, 2020, 8:45 AM IST

मुंबई - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने लॉकडाऊन काळात कुर्ला ते टिळक नगर दरम्यान जलमार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण केले आहे. तसेच, जसई जवळील कराळ रोड ओव्हर ब्रिजसाठी गर्डर लॉन्चिंग आणि कल्याण व शहाड दरम्यान पीएससी स्लॅबसह गर्डर ब्रिज स्पॅन बदलण्याचे प्रमुख कामही या काळात पूर्ण करण्यात आले आहेत.

रेल्वे रुळावर कामाला गती

मुंबई विभागाने हार्बर मार्गावरील टिळक नगर येथील जलमार्गासाठी नाले रुंदीकरणाचे काम हाती घेतले. कुर्ला ते टिळक नगर दरम्यान विद्यमान प्री-स्ट्रेस्ड स्लॅब पूल 4.5 मीटर स्पॅनचा असून ब्राह्मणवाडी नाल्याला जोडलेला आहे. पावसाळ्यात वाहणार्‍या जलमार्गाच्या वहनासाठी अतिरिक्त बॉक्स टाकण्यात आले. प्रत्येकी 24 तासांचे दोन ब्लॉक्स घेऊन 12 बॉक्सेस टाकण्यात आलेत. मशीन आणि मनुष्यबळ एकत्रित करण्यासाठी बृहत् मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी समन्वय स्थापित केले गेले. या कामाची तयारी 10 दिवसांपूर्वी सुरू केली होती. तर, 4 मे रोजी आणि पहिल्या ब्लॉकमध्ये कट अँड कव्हर पद्धतीने 6 बॉक्स टाकण्यात आले. 8 मे रोजीच्या दुसर्‍या ब्लॉकमध्ये आणखी 6 बॉक्सेस घातले गेले.

कुर्ला ते टिळक नगर दरम्यान जलमार्गाचे रुंदीकरण

रोड क्रेनचे कामकाज सुलभ करण्यासाठी दोन टॉवर वॅगन वापरुन ओएचई स्लीव्ह केले. हे काम विक्रमी वेळेत पार पडले. 400 टन क्षमतेची क्रेन, 2 फराना, 2 डंपर, 2 पोकलेन्स, 1 जेसीबी, 80 कामगार, 8 पर्यवेक्षक, 2 अधिकारी इत्यादींनी हे काम पूर्ण करण्यासाठी अखंड काम केले. या अतिरिक्त बॉक्समुळे जलमार्ग 4.5 मीटर वरुन 10.5 मीटर करण्यात आला आहे.

पनवेल-जेएनपीटी विभागातील राष्ट्रीय महामार्गापासून जेएनपीटी ते पनवेल-जेएनपीटी विभागातील किमी ९०/०-१ मध्ये यार्ड धारण करण्यासाठी जेएनपीटी येथे प्रस्तावित चौथ्या टर्मिनलला जोडण्यासाठी कराळफाटा इंटरचेंजसाठी कराळ रोड ओव्हर ब्रिजचे महत्वपूर्ण पायाभूत काम केले गेले. या रोड ओव्हर ब्रिजसाठी ५४ मीटर्सचे ९० एमटी वजनाचे ७ संयुक्त स्टील गर्डर आणणे हे आव्हानात्मक काम होते. जेएनपीटीकडून माल वाहतुकीला अडथळा न आणता सामाजिक दूरीच्या निकषांचे पालन करून ६०० टन एक क्रेन आणि ७५० टनाच्या दुसऱ्या क्रेनने २० कामगारांनी ४ दिवसांच्या विक्रमी वेळेत हे अवघड कार्य पूर्ण केले.

कल्याण आणि शहाड दरम्यान वालधुनी नदीवरील मुंबई विभागातील सर्वात जुन्या पुलाच्या सुपर स्ट्रक्चरच्या दोन्ही मार्गावर स्टीलच्या गर्डरचे प्रत्येकी ९.१४ मीटरचे ३ स्पॅन आहेत. वातावरणामुळे खराब झालेले हे स्टील गर्डर्स आरडीएसओच्या मान्यताप्राप्त डिझाइनच्या पीएससी स्लॅबने बदलण्यात आले आहेत. हे काम करताना साधारणपणे १५-२० दिवसांत प्रत्येकी ४ तासांमध्ये ६ ट्रॅफिक ब्लॉक बदलण्यात आले असते. परंतु लॉकडाऊनमुळे कमी रहदारीमुळे ते जलदपणे पूर्ण होण्यास सक्षम झाले. मुख्यालय आणि रेल्वे बोर्डानेही या महत्त्वपूर्ण या पायाभूत सुविधांच्या आवश्यक कामाचे कौतुक केले आहे. २५० मेट्रिक टन, २०० मेट्रिक टन व १०० मेट्रिक टनाच्या प्रत्येकी एक क्रेन, एक पोकलेन, एक जेसीबी, २ ट्रेलर, ९ वॅगनभरून खडीचा रॅक, २ टॉवर वॅगन्स, ३ अधिकारी आणि ९ पर्यवेक्षक १४० कामगारांसह हे शक्य झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details