मुंबई -वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे महाराष्ट्रासह मुंबईत कडक निर्बंध लावण्यात आले आहे. त्यात लॉकडाऊन लागण्याच्या भीतीमुळे परप्रांतीय मजुरांच्या हजारोंच्या संख्येने मुंबईतून गावाकडे परतू लागले आहेत. परिणामी रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळू लागली आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वेने कंबर कसली असून त्याप्रमाणे नियोजन सुरू केले आहे.
मुंबईमधून गावी परतणाऱ्या मजुरांच्या गर्दीसाठी रेल्वे प्रशासन सज्ज - मजुरांच्या गर्दीसाठी रेल्वे प्रशासन सज्ज
कोरोना काळात या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ज्या रेल्वे स्थानकावरून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात, त्या स्थानकावर आरपीएफ आणि जीआरपी पोलीस तैनात करण्यात आले आहे. तसेच ज्या प्रवाशांचे तिकिट आरक्षित आहे. अशाच प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर प्रवेश देण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर प्रवाशांची थर्मल स्क्रीन केली जात आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या गर्दीवर रेल्वे प्रशासनाला नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे.

आरक्षित तिकीट असणाऱ्यांना प्रवेश
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतून परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात गावाकडे जात असल्याने मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर टर्मिनस आणि छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी दिसून आली होती. कोरोना काळात या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयोजना करण्यात आल्या आहेत. ज्या रेल्वे स्थानकांवरून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात, त्या स्थानकावर आरपीएफ आणि जीआरपी पोलीस तैनात करण्यात आले आहे. तसेच ज्या प्रवाशांचे तिकिट आरक्षित आहे. अशाच प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर प्रवेश देण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर प्रवाशांची थर्मल स्क्रीनींग केली जात आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या गर्दीवर रेल्वे प्रशासनाला नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे.