मुंबई : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मुंबई लेनला ट्रेलरने चार वाहनांना धडक दिल्याने ( Trailer blows up four vehicles ) दोघांचा मृत्यू झाला ( Two Died In Accident On Mumbai Pune Express Way ) आहे. तर अन्य दोघे जण या अपघातात जखमी झाले आहेत. अपघातात अनिता सिंग वय 54 या गंभीर जखमी आहेत. तर दुसरे जखमी असलेले अखिलेश सिंग वय 55, रा. रोसे पारडे, पुणे या दोघांवरही एमजीएम कामोठे येथे उपचार करण्यात येत आहेत. घटनास्थळी आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलिस स्टेशनची यंत्रणा, डेल्टा फोर्स, लोकमान्य आरोग्य सेवा यांनी मदतकार्य केले.
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात.. ट्रेलरने चार वाहनांना उडवले.. दोन ठार असा झाला अपघात
या अपघातात चालकाचे ट्रेलरवरचे नियंत्रण सुटल्याने ट्रेलरची पहिली धडक एका हुंडाई कारला बसली. त्यानंतर काही अंतरावर दुसरी धडक क्रेटा कारला झाली. त्यामुळे क्रेटा कार मिडील गार्डनमध्ये गेली. पुढे जाऊन किलोमीटर काही अंतरावर ट्रेलरने ईरटीगा गाडीला धडक दिली. आणि त्यापुढे पुन्हा बलेनो गाडीला धडक दिली. त्यामुळे ती गाडी उलटली व काही अंतरावर तो ट्रेलर जाऊन महामार्गाच्या डाव्या बाजूस कलडला.
दोघांचा मृत्यू
ट्रेलरने एकूण चार वाहनांना धडक दिली. सुदैवाने त्या चार गाड्यातील प्रवाशांना किरकोळ मार लागलेला आहे. त्यापैकी दोघांना एमजीएम कामोठे रुग्णालयात दाखल केले असून, ट्रेलरमधील दोन जणांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोन्ही मृतांचे नाव समजू शकले नाही.