महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Air quality: चिंताजनक! आता मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांची हवेची गुणवत्ताही धोक्याच्या पातळीवर - हवेची गुणवत्ताही धोक्याच्या पातळीवर

मुंबई, पुणे, चंद्रपूर, नाशिक, शहराची हवेची गुणवत्ता घसरली असल्याचे समोर आले ( Mumbai Pune Chandrapur Nashik Air quality ) आहे. त्यावर पर्यावरण प्रेमींकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम ( National Clean Air Program ) अतर्गत हे समोर आले आहे. यात दिल्लीची हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले ( Air quality dropped to dangerous level ) आहे.

Maharashtra Air quality
मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांची हवेची गुणवत्ताही धोक्याच्या पातळीवर

By

Published : Jan 11, 2023, 10:31 AM IST

मुंबई :राज्यातील मुंबई, चंद्रपूर, नाशिक आणि पुणे ही शहरे तीन वर्षांपूर्वी धोक्याच्या पातळीकडे नव्हती. मात्र आता वाढलेले प्रदूषण त्यामुळे ही शहर धोक्याच्या पातळीकडे जात असल्याचे समोर आलेला आहे. नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम ( National Clean Air Program ) अंतर्गत केलेल्या शोध अभ्यासामध्ये देशातील आणि महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता घसरली असल्याची गंभीरपणे बाब नमुद आहे. चित्तरंजन टेंभेकर यांनी केलेल्या शोध अहवालात दिल्ली हे सर्वात प्रदूषित शहर तर महाराष्ट्र राज्यात मुंबई, पुणे, चंद्रपूर, नाशिक ह्या शहरांची हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत ( Mumbai Pune Chandrapur Nashik Air quality ) आहे. आता धोक्याची पातळी ओलांडत आहे. त्यामुळे गंभीरपणे चिंता व्यक्त केली ( Air quality dropped to dangerous level ) आहे.

हवेची गुणवत्ताही धोक्याच्या पातळीवर

मुंबई धोक्याच्या पातळीकडे : हवेच्या गुणवत्तेच्या संदर्भात जी शहरे आधी वरच्या क्रमांकावर होती. ती सर्व शहरे आता धोक्याच्या पातळीकडे जात आहेत. येत्या काळात ही धोक्याची पातळी ती शहरे ओलांडतील अशी भीती यामध्ये व्यक्त केली आहे. जगातील सर्वात प्रदूषित शहर दिल्ली असे त्यात म्हटलेले आहे. तसेच महाराष्ट्रातील मुंबई या शहराचा देखील धोक्याच्या पातळीकडे क्रमांक जात आहे असे देखील त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

सर्वात कमी प्रदूषित नवी मुंबईची अवस्था? :या अहवालाच्या शोध अभ्यासामध्ये देशातील वेगवेगळ्या शहरांचा समावेश ( environmentalist expressed Concern ) आहे. 44 ते 46 टक्क्यांनी कार्बनच्या कणांचा भाग वाढत आहे. जर याच प्रमाणे हवेच्या सोबत कार्बनच्या कणांची संख्या अतोनात वाढली तर प्रदूषणाच्या विळख्यामध्ये राज्यातील शहर देखील ओढली जाणार आहे.2019 मध्ये सर्वात कमी प्रदूषित असलेल्या नवी मुंबई, चंद्रपूर, पुणे आणि नाशिक ही शहरे आता PM 2.5 किंवा PM10 च्या बाबतीत हवेच्या गुणवत्तेत वेगाने मागे पडत आहेत, असे तज्ज्ञांनी सांगितले. तज्ञांनी यावर जोर दिलेला आहे की राज्यातील ही शहर कमी प्रदूषित अशा प्रमाणात होते.


दिल्ली एवढी खराब परिस्थीती नाही :दिल्लीमध्ये सर्वाधिक प्रदूषण होत असल्यामुळे वार्षिक सरासरी PM 2.5 एकाग्रता 99.7 ug/m3 ( Delh air quality at sever level ) आहे. तथापि, दिल्लीचे 2.5 पातळी 2019 च्या तुलनेत 7 टक्के पेक्षा जास्त सुधारली आहे, असे राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रम (NCAP) च्या विश्लेषणाने सुचवले आहे. हवेच्या गुणवत्तेसाठी राष्ट्रीय मानकांची पूर्तता न करणारी शहरे अशी महाराष्ट्रातील या प्रमुख शहरांची गणना होत आहे. दिल्ली हे शहर त्यापैकी एक आहे. PM 2.5 आणि PM 10 साठी देशाची सध्याची वार्षिक सरासरी सुरक्षित मर्यादा 40 मायक्रोग्राम प्रति घनमीटर आणि 60 मायक्रोग्राम प्रति घनमीटर आहे.

अभ्यासक दयानंद स्टालिन : पर्यावरणाचे अभ्यासक दयानंद स्टालिन सांगतात की, या सर्व प्रदूषणाच्या संदर्भात केंद्र शासनाने 2026 पर्यन्त प्रदूषण 40 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानुसार काही प्रमाणात पावले टाकायला सुरुवात केली. मात्र ही पावले पुरेशी नाहीत. याच कारण एकूणच मोठ्या शहरांमध्ये होणारे प्रदूषण हे विविध कारणांनी होते. त्याच्यामुळे केवळ एकाच कारणावर लक्ष देऊन चालणार नाही अनेक कारणांवर लक्ष द्यायला हवे. जसे की वाहनांमुळे प्रचंड प्रदूषण होते यावर ठोस उपाययोजना करायला हवी.

ABOUT THE AUTHOR

...view details