मुंबई - पुढील महिन्यात ६ डिसेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्टइंडीज यांच्यात टी-20 सामना खेळविला जाणार आहे. मात्र, या सामन्यासाठी लागणारी पोलीस सुरक्षा व्यवस्था देण्यास मुंबई पोलिसांकडून नकार देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
भारत विरुद्ध वेस्टइंडिज सामन्याला पोलीस सुरक्षा देण्यास मुंबई पोलिसांची असमर्थता - सहा डिसेंबर बातमी
६ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दाखल होतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी व पोलीस बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस मनुष्यबळ वापरण्यात येते.
हेही वाचा-प्रशासनाने काश्मीरवरील निर्बंधांबाबत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावे - सर्वोच्च न्यायालय
६ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दाखल होतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी व पोलीस बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस मनुष्यबळ वापरण्यात येते. याबरोबरच सहा डिसेंबर रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यामुळे संवेदनशील परिसरामध्ये मुंबई पोलिसांना मोठा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. याचदरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडीज टी-20 सामन्यासाठी पोलीस बळ अपुरे पडत असल्याचे कळत आहे. मात्र, यावर तोडगा काढण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी लवकरच मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.