महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bogus Call Center: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई, बोगस कॉल सेंटरवर छापा; 6 जणांना अटक - मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोरेगाव भागात एका कार्यालयावर छापा टाकून, बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. (Bogus Call Center) यामध्ये 6 जणांना अटक केली आहे. आरोपी कमोडिटी ट्रेडिंगमध्ये तज्ञ असल्याचे भासवून लोकांना त्यांच्या खात्यात 200 रुपये जमा करण्याचे आमिष दाखवत असत असे पोलिस तपासात समोर आले आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

By

Published : Dec 27, 2022, 10:48 PM IST

मुंबई - गोरेगाव येथील एका आलिशान इमारतीत बनावट कॉल सेंटर चालवून लोकांची ४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आज मंगळवार (दि. 27 डिसेंबर)रोजी सहा जणांना अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री एसव्ही रोड, डीएलएच पार्ट येथील कार्यालयावर छापा टाकला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. (bogus call center) आरोपी फॉरेक्स शेअर्स, करन्सी आणि कमोडिटी ट्रेडिंगमध्ये तज्ञ असल्याचे भासवून सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून लोकांना आमंत्रित करायचे आणि लोकांना व्यापार सुरू करण्यासाठी त्यांच्या खात्यात 200 अमेरिकन डॉलर जमा करण्याचे सांगत असत.

यातील आरोपींनी लोकांची 4 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच, या छाप्यात सहा लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे असे पोलिस तपासात आढळून आले आहे. दरम्यान, यातील आरोपींवर माहिती तंत्रज्ञान कायदा आणि इतर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details