महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोस्टल बॅलेटच्या सहाय्याने पोलीस निवडणुकीनंतर बजावणार मतदानाचा हक्क - मुंबई पोलीस

मुंबई पोलीस पोस्टल बॅलेटच्या सहाय्याने निवडणुकीनंतरही मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Mumbai police

By

Published : Apr 18, 2019, 6:28 PM IST

मुंबई - कर्तव्य बजावणाऱ्या कोणत्याही पोलिसाचा मतदानाचा हक्क हिरावला जाऊ नये. यासाठी पोस्टल बॅलेटच्या मदतीने निवडणुकीनंतर पोलीस आपला मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत.

मुंबई पोलीस

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मुंबई पोलिसांना मतदानाचा हक्क बजावता यावा. यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलात ५० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत. मुंबईत २९ एप्रिलला मतदान होणार आहे. यावेळी सगळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असतील. त्यामुळे ज्या पोलिसांना २९ तारखेला मतदान करता येणार नाही त्यांना पोस्टल बॅलेट दिले जाणार आहेत.

मुंबईत लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर निवडणूक आयोग ठरवेल त्या दिवशी आणि त्या ठिकाणी जाऊन हे पोलीस कर्मचारी आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील. आत्तापर्यंत १६ हजार पोलिसांनी पोस्टल बॅलेटसाठी अर्ज केल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते मंजुनाथ सिंघे यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details