मुंबई-केरळमधील सीपीएम पक्षाचे प्रमुख बलाकृष्णन कोडीएरी यांचा मुलगा बिनोय कोडीएरी याच्या विरोधात मुंबईच्या पोलीस स्थानकात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांचे पथक केरळमध्ये दाखल झाले आहे. बिनोय कोडीएरी याचा जबाब घेण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.
या अगोदर मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात बिनोय कोडीएरी यास जबाब देण्यासाठी ७२ तासांच्या आत ओशिवरा पोलीस ठाण्यात येण्याची नोटीस दिली होती. मात्र, बिनोय याचा मोबाईल बंद येत असून कुठलाही संपर्क होत नसल्याने पोलिसांचे एक पथक केरळ मधील त्याच्या घरी दाखल झाले आहे.
पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांची प्रतिक्रिया काय आहे प्रकरण?
या प्रकरणातील ३३ वर्षीय पीडित महिला दुबईमधील एका डान्स बारच्या माध्यमातून बिनोय कोडीएरी याच्या संपर्कात आली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर आपण अविवाहित असून आपल्यासोबत शरीरसंबंध ठेवल्यास लग्न करू, असे बिनोय पीडित महिलेला सांगितले. बिनोयच्या भूलथापांना बळी पडलेल्या पीडित महिलेने २००९ पासून २०१५ पर्यंत बोनोयसोबत शरीरसंबंध ठेवले होते. ज्यात त्यांना अपत्य झाले होते. मात्र २०१५ सालापासून दुबईतील बांधकाम व्यवसायात तोटा होत असल्याचे कारण देत बिनोयने पीडित महिलेला पैसे देण्यास नकार दिला. त्यांनंतर पीडितेने बिनोयला लग्न करण्यास सांगितले.
या दरम्यान पीडितेच्या घरच्यांना बिनोय भेटत होता. मात्र, पीडितेला स्वतःच्या घरच्यांशी ओळख मात्र करून देत नव्हता. बिनोय याच्या सोशल माध्यमांच्या माहितीवरून तो आगोदरच विवाहित असून त्यास दोन मुले असल्याचे पीडितेच्या लक्षात आले. या प्रकरणी वेळोवेळी लग्नाचा तगादा लावूनही आरोपी लग्न करीत नसून खर्चास पैसे देत नसल्याने पीडित महिलेने ओशिवरा पोलिसांकडे बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.