मुंबई :मुंबईतीलच एका कारागृहात माहिर सिद्दीकी हा कैदी अंडर ट्रायल होता. मात्र पोलिसांना तो कुठे फरार आहे हे माहिती नव्हते. तपासादरम्यान, तो मुंबईतल्याच एका तुरुंगात अंडर ट्रायल कैदी होता, हे समोर आले. याबाबत मोकोका न्यायालयाने आश्चर्य व्यक्त करत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. पुराव्या अभावी आरोपीची सुटका केली.
कार्यपद्धती नियमानुसार करणे अपेक्षित शेरे :महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) प्रकरणांचे विशेष न्यायाधीश ए एम पाटील यांनी खुनाच्या आरोपीची निर्दोष मुक्तता केली. आरोपीने बॉम्बे अमन कमिटीचे अध्यक्ष वाहिद अली खान यांचा खून केल्याचा आरोप माहिर सिद्दीकी याच्यावर होता. यावेळी पोलिसांना सुनावत कोर्टाने, पोलिसांकडे अंडर ट्रायल कैद्यांचे तपशील असतात. तरीही पोलिसांना या तुरुंगात असलेल्या आरोपीचा पत्ता लागू नये याचे रहस्य काय असा प्रश्न विचारला. पोलिसांना आपली कार्यपद्धती नियमानुसार करणे अपेक्षित असल्याचे शेरे देखील नमूद केले.
विविध राज्यांमध्ये पथकेही जाऊन आली : सन 1999 मध्ये बॉम्बे अमन कमिटीचे अध्यक्ष वाहिद अली खान यांच्या हत्येचा आरोप माहिर सिद्दीकी याच्यावर होता. तो दुसऱ्या एका प्रकरणात तुरूंगात पोलिसांकडे अंडर ट्रायल होता. मात्र हे त्या पोलिसांना माहित नव्हते. माहिर सिद्दीकी याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले. विविध राज्यांमध्ये पथकेही जाऊन आली. अटक वॉरंट जारी केले. अखेर त्याचा तपास लागला. माहिर सिद्दीकी हा शार्प शुटर आहे. तुरुंगात अंडर ट्रायल कैदी असल्याने तो बाहेर आढळून येत नव्हता. मागील 20 वर्षांपासून फरार असल्यातचे त्याला पोलिसांनी जाहीर केले होते.