मुंबई - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडॉऊन अधिक कडक करण्यात आला आहे. मात्र, काही लोक विनाकारण दुचाकी व रिक्षा घेऊन भटकत असल्याचे दिसून येत असल्याने पवई पोलिसांनी आज आयआयटी मेन गेटसमोर अशा लोकांना अडवून थेट उठाबशा काढायला लावत चांगलीच अद्दल घडविली. पवईत लॉकडॉऊन काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली जात आहे.
लॉकडॉऊन काळात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या लोकांना उठाबशा काढण्याची शिक्षा - मुंबई कोरोना अपडेट्स
पवई परिसरात रुग्ण आढळत असल्याने सर्व रस्ते बंद केले. मात्र, काही लोक अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी म्हणून बाहेर पडत शासनाच्या आदेशाचा गैरफायदा घेत आहेत.
![लॉकडॉऊन काळात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या लोकांना उठाबशा काढण्याची शिक्षा mumbai police took action against those who did not following lockdown rules](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6843640-761-6843640-1587206027179.jpg)
mumbai police took action against those who did not following lockdown rules
पवई येथील विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोड वरून ठाणे, मुंलुंड, नवी मुंबई व अंधेरी, गोरेगाव जाणाऱ्या लोकांना आज पवई पोलिसांनी आयआयटी मेन गेटसमोर अडवून चौकशी केली व अनावश्यक फिरणाऱ्या लोकांना रस्त्यावर उठाबशा काढण्यास लावले तर मोटारसायकल व रिक्षांच्या टायरमधील हवा सोडून देत कारवाई करीत चांगलेच खडसावले.