महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chrisann Pereira: अभिनेत्री क्रिशन परेराला ड्रग्ज प्रकरणात फसवणाऱ्या आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल - अभिनेत्री क्रिसन परेरा

अभिनेत्री क्रिसन परेरा विषयी एक बातमी आली आहे. क्रिसन परेराला पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. मात्र, या प्रकरणानंतर अभिनेत्रीची तुरुंगातून सुटका झाली होती. आता या प्रकरणात अभिनेत्रीला फसवणाऱ्या अँथनी पॉल आणि राजेश दामोदर आरोपींविरुद्ध मुंबई गुन्हे शाखेने मुंबई न्यायालयात 1514 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

Chrisann Pereira
बॉलीवुड अभिनेत्री क्रिसन परेरा

By

Published : Jun 21, 2023, 6:21 PM IST

Updated : Jun 21, 2023, 6:51 PM IST

मुंबई : 'सडक 2' आणि 'बाटला हाऊस' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री क्रिशन परेरा अडचणीत सापडली होती. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी परेरा यांना ड्रग्जच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. अभिनेत्रीला संयुक्त अरब अमिरातीतील शारजाह सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते. नंतर तिची सुटका करण्यात आल्याची माहिती परेरा कुटुंबियांनी बुधवारी सोशल मीडियात दिली होती. त्याचवेळी शारजाह विमानतळावर उतरल्यापासून त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला होता.

आरोपींना 4 मे पर्यंत पोलीस कोठडीत होते: दोन आरोपींना एका ट्रॉफीमध्ये अमली पदार्थ देऊन क्रिशनला शारजाहमध्ये पाठविले होते. यानंतर क्रिशन १ एप्रिलपासून शारजाहमध्ये कैदेत आहे. अभिनेत्रीच्या आईने मुंबई गुन्हे शाखेत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. 32 वर्षीय अँथनी पॉल आणि 42 वर्षीय राजेश दामोदर बोबाटे उर्फ रवी, अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांना 4 मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले होते. अँथनी पॉल हा मुंबईतील बोरिवलीचा रहिवासी आहे. तर त्याचा साथीदार राजेश बाभोटे उर्फ रवी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी आहे.

जुने वैमनस्य असल्याने रचला कट :क्रिशनसह दोन जणांना शारजाह पोलिसांनी अटक केली होती. इतर तिघेजणांनी शारजाहमधील अधिकाऱ्यांची नजर चुकवण्यात यश मिळविण्यात आले. परेरा कुटुंबियांविरोधात जुने वैमनस्य असल्याचा राग काढत पॉलने क्रिशनचा गुन्ह्यात अडकविल्याची माहिती समोर आली होती. पॉलने यापूर्वीदेखील काही जणांची अशीच फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. क्रिशनने वेबसिरीज सडक २ मध्ये काम केले आहे. ती कुटुंबासह बोरिवली उपगनरात राहते.

Last Updated : Jun 21, 2023, 6:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details