मुंबई- गॅंगस्टर रवी पुजारीला भारतीय तपास यंत्रणांनी सेनेगल येथून प्रत्यर्पण करून भारतात आणल्यानंतर त्याचा ताबा मुंबई पोलिसांकडे मिळालेला आहे. 2016 मध्ये मुंबईतील विलेपार्ले परिसरातील गजाली हॉटेलच्या बाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांना गॅंगस्टर रवी पुजारी याचा ताबा मिळालेला आहे. या प्रकरणात एकूण 7 आरोपी आहेत. त्यांचा मुख्य सूत्रधार रवी पुजारी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
कुख्यात गुंड रवी पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांकडे - Mumbai police news
कुख्यात गुंड रवी पुजारीला भारतीय तपास यंत्रणांनी सेनेगल येथून प्रत्यर्पण करून भारतात आणल्यानंतर त्याचा ताबा मुंबई पोलिसांकडे मिळालेला आहे. 2016 मध्ये मुंबईतील विलेपार्ले परिसरातील गजाली हॉटेलच्या बाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांना गॅंगस्टर रवी पुजारी याचा ताबा मिळालेला आहे
कुख्यात गँगस्टर रवी पुजारीविरुद्ध मुंबईत दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यास अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून प्रत्यर्पण प्रस्ताव सादर करण्यात आला होता. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कर्नाटकातून त्याचा ताबा घेऊन त्यास अटक करण्यात आली आहे. रवी पुजारी हा मालपे, (कर्नाटक) येथील मूळचा राहिवासी आहे. 1990 मध्ये त्याने छोटा राजन टोळीसाठी काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने स्वतःची गुन्हेगारी टोळी बनवून खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न यासारखे गुन्हे केलेले होते. रवी पुजारीने मुंबई , बंगळुरु, मंगळुरु येथे वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यावसायिक, सिने क्षेत्रातली नामवंत अभिनेते यांना खंडणीसाठी धमकी दिली होती व त्यासाठी त्याने स्वतःची टोळीही बनवली होती.
हेही वाचा -मुंबईच्या जुहू चौपाटीवर क्लिन अप मार्शल आणि पर्यटकांमध्ये बाचाबाची