मुंबई:दाखल गुन्ह्यांतसोमय्यांवर 3 कलमे लावण्यात आली आहेत. यात कलम 34 चाही समावेश आहे. त्यामुळे पोलिसांना अटकेसाठी वॉरंटची गरज पडत नाही. त्यामुळे सोमय्यांना अटक होऊ शकते. आयएनएस विक्रांतला वाचवण्याच्या नावाखाली, सोमय्यांनी घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केला. माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीनंतर सोमय्यांविरोधात मुंबईतल्या ट्रॉम्बे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सोमय्यांसह त्यांचे पुत्र निल यांच्या विरोधात कलम 420, कलम 406 आणि कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
INS Vikrant Case : आयएनएस विक्रांत प्रकरणात सोमय्या पिता-पुत्राला मुंबई पोलिसांची समन्स - summons Somaiya father and son
शिवसेना खा. संजय राऊतांनी (Shiv Sena MP Sanjay Raut) आयएनएस विक्रांतवरुन (INS Vikrant) किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) घेरले. माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील यांना चौकशीसाठी हजर रहावे असे समन्स ( summons Somaiya father and son) बजावण्यात आले आहेत.
गुन्हा दाखल केल्याप्रमाणे 58 कोटी कसे आणि कुठून आले याची माहिती आता पोलिसांना सांगावी असे सोमय्या म्हणतायत. तर आधी हिशेब द्या मग पुरावे देतो असे प्रतिआव्हान राऊतांचे आहे. 711 ब्लाॅक मधून सोमय्यांनी पैसे गोळा केले आणि पीएमसी बँकेच्या माध्यमातून पैसे व्हाईट केले असा दावा राऊतांचा आहे. 2014-15 मध्ये सरकारने आयएनएस विक्रांत ही युद्धनौका भंगारात काढली. मात्र त्यावर मुझियम करावे अशी मागणी झाली. त्यासाठी 200 कोटींची गरज होती. त्याचवेळी सोमय्यांनी मोहीम सुरु करुन पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. मात्र वायद्याप्रमाणं हे पैसे राजभवनात जमा झालेच नसल्याचे समोर आले. त्यामुळे अशा भ्रष्ट पुढाऱ्यांना आता लोकच जोडे मारतील अशी बोचरी टीका राऊतांनी केली होती.
हेही वाचा : Gunratna Sadavarte : गृहमंत्री आणि सुप्रिया सुळेंची लाय डिटेक्टर टेस्ट करा - सदावर्ते