मुंबई- साहसी पद्धतीने सेल्फी घेण्याचा मोह तुमच्या जीवावर कसा बेतू शकतो, याचे उदाहरण देणारा एक व्हिडीओ मुंबई पोलिसांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. मुंबईत या आगोदरही साहसी सेल्फी घेताना अनेकजणांचा अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
सेल्फी घेताय, थांबा...! मुंबई पोलिसांनी शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप - सेल्फी
साहसी पद्धतीने सेल्फी घेण्याचा मोह तुमच्या जीवावर कसा बेतू शकतो, याचे उदाहरण देणारा एक व्हिडीओ मुंबई पोलिसांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.
![सेल्फी घेताय, थांबा...! मुंबई पोलिसांनी शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3171910-thumbnail-3x2-mp.jpg)
या घटनेला अनुसरूनच मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एका उंच इमारतीच्या गच्चीच्या टोकावरून एक व्यक्ती सेल्फी घेताना तोल जाऊन पडतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओसंदर्भात लिहिताना मुंबई पोलिसांनी, हा साहसी पद्धतीने सेल्फी घेण्याचा प्रयत्न होता, की एक बेजबाबदार धाडस? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
यावर मुंबई पोलिसांच्या अकाऊंटवर नेटकऱ्यांनी या व्हिडिओबद्दल बोलताना नक्कीच हे बेजबाबदार धाडस असल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ मुंबईतील नसल्याचेही स्पष्ट केले आहे. मात्र, हा व्हिडीओ कुठला हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.