महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Seized Heroin : मालाडमधून एक कोटींचे हेरॉईन मुंबई पोलिसांनी केले जप्त - एक कोटींचे हेरॉईन मुंबई पोलिसांनी केले जप्त

अमली पदार्थ विरोधी कक्ष कांदिवली युनिटने मोठी कारवाई केली आहे. मालाड येथील मालवणी परिसरातून हेरॉईन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. 20 वर्षीय आणि 19 वर्षीय आरोपींना अटक करण्यात आली असून हे दोघेही नालासोपारा येथील रहिवासी आहेत.

crime
crime

By

Published : Dec 6, 2022, 9:48 PM IST

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्ष कांदिवली युनिटने मोठी कारवाई केली आहे. मालाड येथील मालवणी परिसरातून हेरॉईन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. 20 वर्षीय आणि 19 वर्षीय आरोपींना अटक करण्यात आली असून हे दोघेही नालासोपारा येथील रहिवासी आहेत. या दोघां विरोधात एन डी पी एस कायदा 1985 कलम 8 क सह 21 क आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई काल रात्री बारा वाजताच्या सुमारास करण्यात आली.

५ डिसेंबरला रात्री १२ वाजताच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी कक्ष, कांदिवली युनिट मुंबई येथील प्रभारी पोलीस निरीक्षक रूपेश नाईक आणि पथक हे गोरेगांव (पू), मुंबई परिसरात गस्त करीत असताना, कुमार पान भांडार दुकानाच्या समोर, सवेरा हाईटस जवळ, बी.एम.सी. कॉलनी, अब्दुल रशीद रोड, मालवणी गेट नं. ०५, मालाड पश्चिम या ठिकाणी दोन इसम त्यांचे हातात काळया रंगाची प्लॅस्टिक कॅरीबॅग घेवून संशयास्पदरित्या उभे असल्याचे दिसून आले.

गस्ती पथकास पाहताच या दोन्ही इसम तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पथकाने त्यांना घेराव घालून शिताफीने ताब्यात घेतले. या दोन्ही इसमांची दोन पंचासमक्ष तपासणी केली असता एका इसमाचे ताब्यात १५० ग्रॅम 'हेरॉईन व दुसऱ्या इसमाचे ताब्यात १३० ग्रॅम 'हेरॉईन' असा एकुण २८० ग्रॅम वजनाचा 'हेरॉईन' हा अमली पदार्थ आढळून आला. या अमली पदार्थाची किंमत १ कोटी १२ लह इतकी आहे. त्या अन्वये नमुद दोन्ही इसमांविरुद्ध कलम ८ (क) सह २१ (क), २९ एन. डी. पी. एस. कायदा १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्या इसमांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

एक आरोपी २० वर्षीय तर दुसरा आरोपी १९ वर्षीय असून दोघेही पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे राहणारे आहेत. जप्त केलेला २८० ग्रॅम 'हेरॉईन' हा अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १ कोटी १२ लाख इतकी आहे. आरोपींकडुन जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थ बाबत अधिक तपास करून त्याचा पुरवठादाराचा शोध घेत आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details