मुंबई-कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण पाहता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा 31 जुलै पर्यंत वाढवला गेला आहे. गेल्या 48 तासात मुंबई शहरात रस्त्यावर विनाकारण वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई करत 5 हजार 877 वाहन जप्त केली आहेत. लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या 3 हजार 420 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
20 मार्च ते 1 जुलै या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचार बंदीचे उल्लंघन केल्याच्या 12251 प्रकरणात तब्बल 25267 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदी च्या नियमांचे उल्लंघन करणार्या 3147 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 7617 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. 14512आरोपींना जामिनावर पोलिसांनी सोडून दिलेले आहे.