महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bomb Blast Threat To Mumbai Police : मुंबईत बॉम्बस्फोट करू, मुंबई पोलिसांना ट्विटरवर धमकी

मुंबई पोलिसांना शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांना धमकी देणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याची विचारपूस सध्या सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Bomb Blast Threat To Mumbai Police
संग्रहित छायाचित्र

By

Published : May 23, 2023, 9:38 AM IST

Updated : May 23, 2023, 1:22 PM IST

मुंबई : शहर पोलिसांना मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांना ट्विटर ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस सतर्क झाले असून मुंबई पोलिसांनी या धमकी देणाऱ्याचा शोध सुरू केला होता. पोलिसांना धमकी देणारा संशयित आरोपीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र पोलिसांनी याबाबतची अधिकृत माहिती अद्यापही दिली नाही.

पोलिसांनी घेतला संशयित ताब्यात :मुंबई पोलिसांना मुंबई शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी मिळाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिसांनी तपास करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रात्री केला पोलिसांना मेसेज :मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर एक अज्ञात व्यक्तीने सोमवारी रात्री मेसेज करुन आपण मुंबईत बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी दिली. त्यामुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी ट्विटरवर मेसेज केलेल्या आरोपीचा तपास सुरू केला. पोलिसांनी याप्रकरणी एक संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. हा संशयित आरोपी मनोरुग्ण असल्याची माहिती पुढे येत आहे.

या अगोदरही आला होता धमकीचा फोन :मुंबई पोलिसांना या अगोदरही 21 मे ला धमकीचा फोन आला होता. मुंबईत 26/11 सारखा बॉम्बस्फोट घडवणार असल्याची माहिती या आरोपीने दिली होती. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करुन या आरोपीच्या राजस्थानमधून मुसक्या आवळल्या होत्या. मुंबईत हल्ला करण्याची फेब्रुवारी महिन्यातही धमकी देण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात एनआयएला धमकी देत मुंबईत हल्ला करण्याचे संशयिताने धमकावले होते. पोलिसांनी राजस्थानमधून देवेंद्र तंवर नावाच्या संशयिताला राजस्थानमधून अटक केली. मात्र राजेंद्र हा मानोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. राजेंद्र हा अजमेरचा राहणारा असून मनोरुग्ण राजेंद्रने पोलिसांना धमकावण्यासाठी धमकी दिली होती.

हेही वाचा -

  1. Rape On Teacher : घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत नराधमाचा शिक्षिकेवर अत्याचार, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
  2. 5 People Died In Amravati Accident : अमरावतीत भरधाव ट्रकने कारला चिरडले, एकाच कुटूंबातील 5 जण ठार, तर 7 नागरिक जखमी
  3. Youth Beaten To Officer : वीज पुरवठा तोडल्याने तरुणाचा राग अनावर, वीज वितरण कार्यालयात कर्मचाऱ्याला मारहाण
Last Updated : May 23, 2023, 1:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details