महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 10 बियरबारवर पोलिसांचे छापे - mumbai police

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढली असताना, बुधवारी रात्री शहरातील विविध ठिकाणी १० बियर बारवर मुंबई पोलीसांनी छापे टाकले. या कारवाई दरम्यान सापडलेल्या पुरूष आणि महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

व्हाईट हाऊसवर मारला छापा
व्हाईट हाऊसवर मारला छापा

By

Published : Mar 25, 2021, 11:02 AM IST

मुंबई- देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या मुंबईत कोरोना संक्रमित रुग्णांंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल डिन्ससिंगचे उल्लंघन, असभ्य वर्तन तसेच निर्ज्ंतुकीकरण अशा नियमांचे पालन न केल्याने मुंबई पोलिसांकडून बियर बारवर कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी रात्री मुंबई पोलीसांनी शहरातील विविध ठिकाणी १० बियर बारवर छापे घातले.

मुंबई पोलीसांची कारवाई

हेही वाचा -केंद्र सरकार एकाधिकारशाहीच्या युगाची तुतारी फुंकत आहे; हे देशासाठी घातक!


मुंबईत गैरप्रकारांना आवर घालण्यासाठी मुंबई पोलिसांचे 24 विशेष पथक तैनात करण्यात आले आहेत. या पथकांनी दक्षिण मुंबईतील गोल्डन गुंज, ग्रँट रोड येथील एका बारवर छापा मारून 5 महिला व 15 पुरुष ग्राहकांवर कारवाई केली. तर ताडदेव परिसरातील व्हाईट हाऊस या बारवर छापा मारून 8 महिला 48 पुरुष , कुर्ला येथे 6 महिला व 38 पुरुषांवर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा -फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्ला व परमबीर सिंग यांच्याविरोधात होणार कायदेशीर कारवाई

१० बियर बारवर छापा

बुधवारी रात्री मुंबईतील तब्बल 10 बियर बार वर हा छापा मारण्यात आलेला असून या ठिकाणी कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केलेली आहे. दरम्यान देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात बुधवारी तब्बल 5 हजारांहून अधिक नवीन कोरोणा रुग्णांची नोंद झालेली आहे. राज्यातील कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा हा 32 हजाराच्या पुढे गेला असल्याचे बुधवारी पहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details