मुंबई - अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका 26 वर्षीय महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटने कुर्ला पश्चिम येथे ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान 50 लाख रुपयांचे 503 ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) मिळून आले.
पोलीस उपायुक्त दत्तात्रय नलावडे याबाबत माहिती देताना. मुंबई व उपनगरात करत होती तस्करी -
अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटला मिळालेल्या गुप्त माहितीवरून, फैजी ए दाऊदि बोहरा कब्रस्तान या ठिकाणी सापळा रचण्यात आला होता. या दरम्यान सोफीना सर्फराज खान ही (वय 26) महिला आरोपी तब्बल 503 राम ग्राम वजनाचे एमडी हे अमली पदार्थ घेऊन आली. यावेळी पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिची झडती घेतली असता तिच्याजवळ एमडी अमली पदार्थ आढळून आले.
हेही वाचा -58 कोटी किमतीच्या अमली पदार्थ प्रकरणी 13 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल
मुंबई व मुंबई उपनगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून ही महिला अमली पदार्थांचे वितरण करत होती. यासंदर्भात या महिलेला अटक करण्यात आली असून तिची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.