मुंबईMumbai Police Master Plan :लालबाग, चिंचपोकळी हा परिसर गणेश भक्तांसाठी पंढरी मानला जातोय. दरवर्षी याठिकाणी लाखो गणेशभक्त आपल्या लाडक्याचं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येतात. दरम्यान तरूणाईचं खास आकर्षण असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा कालच पार पडलाय. त्याचबरोबर अन्य गणेश मंडळाचे देखील गणपती बाप्पांचे काल आगमन सोहळे थाटात पार पडले. दरवर्षी आगमन सोहळ्या दरम्यान सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी आणि विनयभंग सारख्या घटना घडतात. मात्र यंदा खास करून मोबाईल चोरट्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी काळचौकी पोलिसांचा मास्टर प्लॅन यशस्वी ठरलाय.
350 मोबाईल चोरी :गेल्या वर्षी गणेश आगमनाच्या दिवशी 350 मोबाईल चोरीला गेले होते. मात्र काळाचौकी पोलिसांच्या या मास्टर प्लॅनमुळे यंदा हा आकडा 71 वर आला आहे. मुंबईतील लालबाग परिसरात गणपती उत्सवादरम्यान मोबाईल चोरी, सोनसाखळी चोरी आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होते. मात्र, या घटना कमी करण्यात काळाचौकी पोलिस ठाण्याचा मास्टर प्लॅन प्रभावी ठरलाय, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलीय.
पोलिसांचा विशेष तपास :गणेश उत्सवादरम्यान दरवर्षी शेकडो मोबाईल चोरीला जातात. हे लक्षात घेऊन या घटनांना आळा घालण्यासाठी आणि पूर्वी चोरी करणाऱ्या, मात्र आता चोरी करणे सोडून दिलेल्या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास सुरू केलाय. याआधी चोरी करणाऱ्यांकडून पोलिसांनी या गर्दीत चोर्या करायला येऊ शकणार्या लोकांची संभाव्य यादी तयार केलीय. सोशल मीडियाच्या मदतीनं या यादीत कोणाची नावं आहेत, यावर पोलिसांनी आधीच नजर ठेवण्यास सुरुवात (Police Master Plan To catch thieves in Ganeshotsav) केलीय.
चोरांना 'असं' पकडलं : गणपती बाप्पाचं आगमन होताच, यातील बहुतांश चोरट्यांनी गर्दीत सामील होऊन मोबाईल चोरण्यास सुरुवात केली. पोलिसांची त्यांच्यावर आधीच करडी नजर होती. पोलिसांनी हजारोंच्या गर्दीतून या चोरट्यांना पकडण्याचं काम सुरू केलं. 5 चोरट्यांना काळाचौकी पोलीसांनी अटक केलीय. काळाचौकी पोलिसांनी मोबाईल चोरांना मोबाईलसह रंगेहात पकडलं. पोलिसांनी या 5 चोरट्यांकडून 6 चोरीचे मोबाईल फोन जप्त केलेत. पण या 6 मोबाईल व्यतिरिक्त अटक केलेल्या चोरट्यानी काही मोबाईल फोन देखील चोरले होते, जे त्यांनी गर्दीत त्यांच्या साथीदारांना दिले होते. पोलिसांच्या या सतर्कतेमुळेमोबाईल चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट (mobile phones stolen) झालीय.
महाराष्ट्राबाहेरील अनेक टोळ्या : एवढंच नाही तर गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्राबाहेरील अनेक टोळ्याही चोरीसाठी सक्रिय होतात. मात्र यंदा त्या टोळ्या मुंबईत आल्याच नाहीत, असा सापळा पोलिसांनी लावला होता. गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांच्या कामात लक्षणीय वाढ होते. कारण एकीकडे लाखो भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येतात आणि अशा स्थितीत कायदा व सुव्यवस्था राखणं, हे पोलीस विभागासमोर मोठं आव्हान बनलेलं असतं. मात्र दुसरीकडे, पोलिसांनाही एका दिवसात शेकडो चोरीच्या घटनांना सामोरं जावं (Ganeshotsav 2023) लागतं.
मास्टर प्लॅन यशस्वी :अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपआयुक्त प्रशांत कदम यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस आयुक्त कल्पना गाडेकर, काळाचौकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद भोवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डिक्टेशन अधिकारी राजेंद्र चौहान, धनंजय व्यवहारे यांच्या पथकाने ही तपासणी केलीय. मास्टर प्लॅन यशस्वीपणे पार पाडला.
हेही वाचा :
- Two Minors Beating Video Viral : मोबाईल चोरीच्या संशयातून व्यापाऱ्यांची दोन अल्पवयीनांना बेदम मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
- Mobile Thief Video : झोपलेल्या लोकांच्या खिशातून मोबाईल चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद; चोरटा अटकेत
- Pune Mobile Theft : पुण्यात मोबाईल चोरांचा सुळसुळाट, एका वर्षात पुणेकरांचे २९ हजारांपेक्षा जास्त मोबाईल चोरीला