मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच वांद्रे कुर्ला संकुल येथे एमएमआरडीए मैदानावर सभा पार पडली. त्यानंतर आता पुन्हा 10 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुंबई पोलीस आणि गेल्या वेळेस सुद्धा ठराविक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पश्चिम उपनगरात ठराविक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ड्रोन आणि उडान क्रियांवर बंदी ठेवली होती. त्याचप्रमाणे 10 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौरादरम्यान देखील मुंबई पोलिसांनी ड्रोन आणि उद्यान क्रियांवर बंदी ठेवलेली आहे.
प्रतिबंधात्मक आदेश : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० फेब्रुवारीला शहर दौऱ्यापूर्वी मुंबई पोलिसांनी आज प्रतिबंधात्मक आदेश जारी केला. जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशात मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, मुंबईच्या पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात 10 फेब्रुवारीला भारताच्या पंतप्रधानांच्या मुंबई भेटीदरम्यान समाज विघातक घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक पावले मुंबई पोलिसांनी उचलली आहेत.
आदेशात काय म्हटलंय ? : मुंबई विमानतळावर, INS शिक्रा, CSMT आणि मरोळ, अंधेरी येथे, दहशतवादी/समाजविरोधी घटक ड्रोन, पॅरा-ग्लाइडर्स, रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्टचा वापर करून हल्ला करू शकतात, असा अहवाल मुंबई पोलिसांना प्राप्त झाला आहे. सार्वजनिक शांततेचा भंग होण्याची सर्व शक्यता आहे आणि मानवी जीवन, आरोग्य, सुरक्षितता आणि सार्वजनिक मालमत्तेला इजा होण्याचा गंभीर धोका आहे, असे पुढे या आदेशात म्हटले आहे. ऑपरेशन विभागाचे पोलीस उपायुक्त शाम घुगे यांनी हा आदेश जारी केला आहे.