मुंबई - बॉलिवूड चित्रपट क्षेत्रातील अभिनेत्यांचे सोशल माध्यमांवर बनावट फॉलोअर्स बनविण्याच्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास केला केला जात आहे. या प्रकरणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर गायक बादशाह यास चौकशीसाठी पोलिसांनी समन्स बजावले होते.
बॉलिवूड रॅपर बादशहा याने फॉलोअर्स वाढवण्यासाठी मोजले चक्क 72 लाख रुपये - बनावट सोशल मीडिया खाती
अभिनेत्यांचे सोशल माध्यमांवर बनावट फॉलोअर्स बनविण्याच्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास केला केला जात आहे.
6 ऑगस्ट व 7 ऑगस्ट रोजी बादशाह याची चौकशी पोलिसांनी केल्यावर त्याने त्याच्या काही गाण्यांसाठी सोशल मीडियावर लाईक्स व व्युव्ह मिळविण्यासाठी तब्बल 72 लाख मोजल्याचे कबूल केले आहे. या पुढे जाऊन मुंबई पोलिसांकडून आता काही अभिनेत्रींना चौकशीसाठी समन्स बाजाविण्यात येणार आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रिमिनल इंवेस्टिगेशन युनिटकडून करण्यात आलेल्या तपासादरम्यान मुंबईतील कुर्ला परिसरातून अभिषेख दौड यास अटक करण्यात आली होती. हा आरोपी बॉलिवूड क्षेत्रातील काही कलाकारांचे सोशल माध्यमांवर लाखोंच्या संख्येने बनावट फॉलोअर्स बनवत होता. पोलिसांच्या अधिक तपासात समोर आले कि, या प्रकरणात मोठे आंतराष्ट्रीय रॅकेट काम करीत होते. आता आरोपी हा फ्रान्सस्थित follqwerskart.com या वेब साईटसाठी काम करीत होता. ज्यात या वेबसाईटच्या क्लाईंटच्या सोशल माध्यमांवरील प्रोफाइलसाठी बनावट फॉलोअर्स व लाईक्स निर्माण केले जात होते. अटक आरोपी अभिषेख याने आतापर्यंत १७६ अकाउंटसाठी ५ लाखाहून अधिक बनावट फॉलोअर्स बनविले आहेत.
कसा झाला खुलासा
बॉलिवूडमधील गायिका भूमी त्रिवेदी हिने सोशल माध्यमांवर तिच्या नावाचा बनावट प्रोफाइल असून त्याचे लाखो फॉलोअर्स असल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली होती. या नंतर अभिनेत्री कोयना मित्रा हिने सुद्धा मुंबई पोलिसांकडे तिच्या बनावट सोशल प्रोफाइलबद्दल तक्रार केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत २ आरोपींना अटक केली असून भारतात अशा प्रकारचे बनावट फॉलोअर्स व लाईक्स बनविणारे १०० वेब पोर्टल व ५४ विदेशी पोर्टल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष तपास पथक नेमण्यात आले असून या प्रकरणी बॉलिवूड, क्रीडा क्षेत्रातील काही जणांना चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आले आहे.