महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सलमान खानला फेसबुकवर मिळालेल्या धमकीचे स्पेन कनेक्शन - सलमान खानला फेसबुकवर धमकी

Salman Khan : परदेशातील व्हिपीएनचा वापर करून धमकी देण्याचे प्रकार वाढत आहे. सायबर गुन्हेगार अशा प्रकारे गुन्हे घडवून आणत आहेत. तर आता अभिनेता सलमान खानला (Actor Salman Khan) गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सोशल मीडिया अकाउंटवरून धमकी मिळाल्यानंतर, त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.

Salman Khan
अभिनेता सलमान खान

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 9:56 PM IST

मुंबई Salman Khan: अभिनेता सलमान खानला (Actor Salman Khan) गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या (Gangster Lawrence Bishnoi) नावाने सोशल मीडिया अकाउंटवरून धमकी मिळाल्यानंतर, मुंबई पोलिसांनी त्याच्या सुरक्षेचा आढावा घेतलाय. स्पेन व्हिपीएनद्वारे सलमान खानला फेसबुकवरून धमकी दिल्याचं तपासात निष्पन्न झाल्याची माहिती, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलीय. दरम्यान, अभिनेत्याला पोलिसांकडून Y+ सुरक्षा या आधीच दिली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांनाही धमकीचा मेल: काही दिवसांपूर्वी देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना पाच वेळा मेलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. प्रत्येक वेळी मेल पाठवणारी व्यक्ती त्याच्या खंडणीच्या रक्कमेत वाढ करत होती. बेल्जियमहून आलेल्या मेलचा आयपी पत्ता शोधून आरोपींना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी इंटरपोलच्या माध्यमातून व्हीपीएन कंपनीची मदत घेतली होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, shadabkhan@mailfence.com वरून मेल आला होता. व्हीपीएन वापरून बेल्जियमचे ठिकाण दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा पोलिसांना संशय होता.



गिप्पीच्या बंगल्यावर अंदाधुंद गोळीबार: कॅनडातील व्हँकुव्हरमधील व्हाईट रॉक परिसरात गिप्पी ग्रेवाल यांचा बंगला आहे. रविवारी गोळीबाराची घटना घडली. गिप्पीच्या बंगल्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर बिश्नोई यांनी फेसबुकवर लिहिलं की, तुम्ही सलमान खानला मोठ्या भावाप्रमाणे वागवता.

सलमान खानला Y+ सुरक्षा :यावर गिप्पीने एका वृत्तवाहिनीवर प्रतिक्रिया देत तो सलमान खानचा मित्र नसल्याचं सांगितलं. गिप्पीने सांगितलं की, तो सलमान खानला फक्त दोनदा भेटला होता. एकदा त्याचा पंजाबी चित्रपट 'मौजान ही मौजान' च्या ट्रेलर लॉन्चवेळी आणि बिग बॉसच्या सेटवर. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, अभिनेता सलमान खानला आधीच पोलिसांकडून Y+ सुरक्षा दिली आहे. खानसोबत एक पोलीस अधिकारी आणि चार हवालदार असतात. याशिवाय खानच्या घराबाहेर दोन पोलीस हवालदारही तैनात आहेत. Y+ सुरक्षेमध्ये पुरविलेल्या पोलिस सुरक्षेत चार सशस्त्र सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणी सलमान खानने कोणतीही तक्रार दिलेली नाही. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केला आहे. या आधीही मार्च २०२३ मध्ये सलमान खानच्या स्वीय सहाय्यकाला धमकीचा ईमेल आला होता, या प्रकरणी पोलिसांनी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा सहकारी गोल्डी ब्रार यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.



हेही वाचा -

  1. Salman Khans Fan : सलमानच्या फॅनचा हैद्राबाद ते मुंबई पायी प्रवास
  2. सलमान खानऐवजी करण जोहर होस्ट करणार 'बिग बॉस 17' चा वीकेंड का वार?
  3. चित्रपट फ्लॉपची जबाबदारी माझी तर हिटचं श्रेय टीमला जातं : सलमान खान

ABOUT THE AUTHOR

...view details