महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एका ट्विटनंतर घडले पोलिसातील माणुसकीचे दर्शन... - पोलिसांतील माणुसकी

टिळक नगर रेल्वे स्थानकाजवळील एखा पुलाखाली अनोळखी वृद्ध व्यक्ती अनेक दिवसांपासून वास्तव्यास होती. अनेक दिवसांपासून त्याने आंघोळ केली नव्हती व काहीच खाल्ले पिले नव्हते. यामुळे तो वृद्ध अशक्त झाला होता व त्याच्याजवळून उग्र वास येत होता. याची माहिती एकाने ट्विटरद्वारे पोलिसांना दिली. त्यानंतर काहीच वेळात पोलीस त्या ठिकाणी जाऊन त्याला आंघोळ घालून उपसारासाठी रुग्णालयात पाठवले.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Jul 2, 2020, 4:18 PM IST

मुंबई- खाकी वर्दीतही माणूसच असतो. हे कोरोना महामारीत पोलिसांनी दाखवून दिले आहे. टिळक नगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी एका रस्त्यावर तडपत पडणाऱ्या बेसहारा वृद्ध व्यक्तीला ताजे जेवण दिले, अंघोळ घातली, चांगले कपडे घालून त्यास उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.

कोरानाचे महाभयंकर संकट असताना या संकटात मुंबई पोलिसांची लक्षणीय कामगिरी वेगवेगळ्या स्वरुपात वेळोवेळी पहायला मिळत आहे. एक वृद्ध एका जागेवर पडून असताना तो आजारी आहे. हे एका दक्ष नागरिकाच्या लक्षात येताच त्याने मदतीसाठी मुंबई पोलिसांना इम्युनल राजन नाडर ट्विटद्वारे कळवले आणि काही क्षणातच टिळक नगर पोलीस टिळक नगर रेल्वे स्थानक जवळील पुलाखाली त्या वृद्धाच्या मदतीसाठी धाव घेतली.

तत्काळ पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू यादव, पोलीस नाईक बबन गावित, पोलीस शिपाई नामदेव कारंडे यांनी पुलाखाली त्या अनोळखी वृद्ध व्यक्तीचा शोध घेतला. त्याच्या जवळ गेले असता त्या वृध्दाजवळून मोठी दुर्घंधी येत होती. अशक परिस्थितीत पोलिसांनी त्याला बाजूला नेले. साबण, पाण्याने त्याला स्वच्छ आंघोळ घातली. त्याला चांगले कपडे घालून उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले.

खाकी वर्दीतही माणूसकीचा झरा असतो. हे कोरोना महामारीत पोलिस मंडळीनी दाखवून दिले आहे. या पोलिसांना वेळेवर कधी-कधी कठोर भूमिका ही घ्यावी लागते. मात्र, त्यात ही जनतेचे हीत असते. हे विसरून चालणार नाही. कठोर भूमिका घेत असताना देखील जनसामान्य आणि भुकेजलेल्याचा आधार बनण्यात महाराष्ट्र पोलीस कायम अग्रेसर आहे. असाच पोलिसांमधील माणुसकीचा झरा टिळक नगर पोलिसांनी दाखवून दिला आहे.

हेही वाचा -गेल्या 24 तासात 2 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू; राज्यात आतापर्यंत ६२ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details