मुंबई -कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, या काळात ऑनलाइन व्यवसाय व होम डिलिव्हरी सुरुच आहे. यामुळे वेबसाईटवर चुकीचे नंबर देऊन ग्राहकांना लाखोंचा गंडा घातला जाऊ शकतो, असा मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्त चैतन्या एस. यांनी दिला आहे.
माहिती देताना पोलीस उपायुक्त कशी होते ऑनलाईन फसवणूक?
कडक निर्बंधामुळे ऑनलाइन फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. होम डिलिव्हरीच्या नावाने गुगलवर नंबर आढळतात. या नंबरशी संपर्क साधला असता ते आपल्याला गुगल पे किंवा फोन पेच्या माध्यमातून ऑनलाइन पैसे द्यावे, अशी मागणी करतात. ग्राहक त्यांना काही पैसे देखील देतात. सायबर चोरटे या ग्राहकांना आणखीन पैसे टाकण्याची सूचना देखील करतात. मात्र, होम डिलिव्हरी काही होत नाही. याउलट ग्राहकांना हजारोंचा फटका देखील बसू शकतो, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा -राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या