मुंबई : स्टंट व्हिडिओ रेकॉर्ड ( Stunt video record ) करण्यासाठी काल ताडदेव परिसरातील इम्पीरियल ट्विन टॉवर्समध्ये प्रवेश ( Entrance to Imperial Twin Towers ) केल्यानंतर मुंबई पोलिसांनी दोन रशियन यूट्यूबर्सवर गुन्हा दाखल केला ( case registered against two Russian YouTubers ) आहे. आयपीसीच्या कलम ४५२ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. ताडदेव पोलिसांनी स्टंट व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी परिसरातील इम्पीरियल ट्विन टॉवर्समध्ये प्रवेश केलेल्या दोन्ही रशियन यूट्यूबर्सना अटक केली. रोमन प्रोशिन (३३) आणि मॅक्सिम शेरबाको (२५) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी याबाबत रशियन वाणिज्य दूतावासाला कळवले आहे. अजूनही त्यांना अटक केलेली नाही.
कोणता गुन्हा दाखल ? : दोघांना पकडल्यानंतर खाजगी मालमत्तेत घुसखोरी करणे, जीव धोक्यात घालून स्टंट व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करणे या कलमांखाली ताडदेव पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ताडदेव पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराची माहिती रशियन दूतावासाला देखील दिली आहे. हे दोन्ही रशियन युट्यूबर जीवघेणे स्टंट करण्यासाठी इमारतीत गेले होते. ही बाब इमारतीमधील सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास येताच त्यांनी ताडदेव पोलिसांना याची माहिती देऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरु केला. अखेर अडीच तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर या दोन्ही रशियन यूट्यूबर्सना ताडदेव पोलिसांनी पकडले आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.