महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टीव्ही चॅनलच्या 'टीआरपी'मध्ये घोटाळा; मुंबई पोलिसांचा खुलासा - Mumbai Police latest news

मुंबई पोलिसांकडून टीव्ही चॅनल्स टीआरपी घोटाळ्याचा एक मोठा खुलासा करण्यात आलेला आहे. काही नागरिकांना सतत एकच चॅनल पाहण्यासाठी पैसे देण्यात येत होते. त्यानुसार त्या चॅनलचा टीआरपी वर जात होता.

आयुक्त परमबीर सिंह
आयुक्त परमबीर सिंह

By

Published : Oct 8, 2020, 5:00 PM IST

Updated : Oct 8, 2020, 8:18 PM IST

मुंबई -पोलिसांकडून चलचित्र वाहिन्यांच्या (टीव्ही चॅनल्स) टीआरपी घोटाळ्याचा एक मोठा खुलासा करण्यात आलेला आहे. आपल्या चॅनेलचा टीआरपी जास्त यावा यासाठी काही चॅनल्स संबंधितांना पैसे देऊन दिवसभर टीव्ही सुरू ठेवत ते चॅनल लावण्यास सांगत होते. हे रॅकेट देशासह विदेशातही अस्तित्वात असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी दिली. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

बोलताना पोलीस आयुक्त परम बीर सिंह

टीआरपीचे मोजमाप करणाऱ्या बीएआरसी (ब्रॉडकास्ट ऑडीयन्स रिसर्च कौन्सिल) म्हणजेच प्रसारण प्रेक्षक संशोधन परिषद या संस्थेच्या एका हंसा नावाच्या एजन्सीवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. देशभरात सुरू असलेल्या वृत्तवाहिन्या व मनोरंजन वाहिन्यांचे मापदंडाचे काम बीएआरसीकडून करण्यात येते.

चलचित्र वाहिन्यांचे टीआरपी ठरवण्यासाठी देशभरात 30 हजारांहून अधिक मापदंड तर मुंबईसारख्या शहरात 2 हजारांहून अधिक मापदंड करायची जबाबदारी बीएआरसीवर आहे. मात्र, याचे कंत्राट हंसा नावाच्या एजन्सीला देण्यात आले होते. टीआरपी छेडछाडीचे रॅकेट परदेशातही अस्तित्वात असल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. मुंबईतील काही अशिक्षित लोकांच्या घरी इंग्रजी न्यूज चॅनल लावून ठेवण्याची अट हंसा एजन्सीकडून घालण्यात येत होती. यासाठी संबंधितांना महिन्याला ठराविक पैसेही दिले जात होते. या टीआरपी घोटाळ्यात दोन मराठी चॅनेल व एक भारतीय इंग्रजी न्यूज चॅनलचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी दोन्ही मराठी चॅनलच्या मालकांना मुंबईतून अटक केली आहे. याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात संबंधित चॅनलच्या मालकापासून कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणार असून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.

अशी होते 'टीआरपी' सोबत छेडछाड

ज्या-ज्या घरात गोपनीय मापदंड (कॉन्फिडेंशियल पॅरामिटर) लावण्यात आले होते. त्यातील डेटा हा दुसरा चॅनल सोबत शेअर करण्यात येत असल्याचा मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या शेअर करण्यात आलेल्या कॉन्फिडेंशिय डेटासोबत छेडछाड करण्यात येत होती. काही घरांमध्ये ते एका विशिष्ट वाहिनीला सतत चालू ठेवण्यात यावे म्हणून सांगण्यात येत होते. यासाठी एजन्सीकडून पैसेसुद्धा दिले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून या दोन्ही आरोपींच्या बँक खात्यातून प्रत्येकी 10 लाख व 8 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत मुंबई पोलिसांना तीन वाहिन्यांची माहिती मिळाली आहे.

यासंदर्भात काही फरार आरोपींचा मुंबई पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून यासाठी गुन्हे शाखेचे काही पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहेत.

मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह नेमके काय म्हणाले..? पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

Last Updated : Oct 8, 2020, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details