मुंबई- सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. मुंबईतील जुहूतारा रोड परिसरात असलेल्या घरातून इंद्रजित चक्रवर्ती यांना बाहेर पडता यावे म्हणून रियाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करुन तिला व तिच्या कुटुंबीयांना घराबाहेर पडताना प्रसिद्धी माध्यमांचा त्रास होत असल्याचे म्हटले होते. यासाठी तिने पोलीस संरक्षणाची मागणी केली असता पोलिसांनी मध्यस्थी करून इंद्रजित चक्रवर्ती यांना ईडी कार्यालयात नेले आहे
रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांना पोलीस ईडी कार्यालयात घेऊन गेले
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात ईडीकडून चौकशी केली जात आहे. सुशांतसिंह याने रिया व तिचा भाऊ शोविक याच्यासह मिळून 2 कंपन्यांची स्थापना केली होती. ज्यात रिया, सुशांत, व शोविक हे एका कंपनीवर संचालक होते ज्याचा नोंदणीकृत पत्ता हा इंद्रजित चक्रवर्ती यांच्या नवी मुंबईतील उलवे येथील फ्लॅट वरचा आहे. यासंदर्भात इंद्रजित चक्रवर्ती यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे.
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात ईडीकडून चौकशी केली जात आहे. या प्रकरणी रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठाणी व सुशांतसिंहचा सीए संदीप श्रीधर, श्रुती मोदी यांच्या सह रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची चौकशी करण्यात आली होती. आज पुन्हा एकदा ईडी चौकशीसाठी रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजित चक्रवर्ती हे ईडी कार्यालयात उपस्थित हजर झाले आहेत.
सुशांतसिंह याने रिया व तिचा भाऊ शोविक याच्यासह मिळून 2 कंपन्यांची स्थापना केली होती. ज्यात रिया, सुशांत, व शोविक हे एका कंपनीवर संचालक होते ज्याचा नोंदणीकृत पत्ता हा इंद्रजित चक्रवर्ती यांच्या नवी मुंबईतील उलवे येथील फ्लॅट वरचा आहे. याच संदर्भात ईडी इंद्रजित चक्रवर्ती यांची चौकशी करणार आहे.