मुंबई : भाजपच्या आणखी एका नेत्याला मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन ( Clean Chit to Mohit Kamboj ) चीट देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल सी समरी रिपोर्ट दिला आहे. कथित बॅंक घोटाळा प्रकरणात मोहित कंबोज यांना पुर्णपणे ( Mumbai Police EOW clean cheat ) क्लीन चीट देण्यात आली आहे. या संदर्भातील अहवाल नुकताच आर्थिक गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या न्यायालयात दाखल केला आहे. त्यामुळे मोहित कंबोज यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात भाजप नेत्या विरोधात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर भाजप नेत्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमधून देण्याचा सपाटा सुरू आहे. आतापर्यंत क्लीनचीट देणाऱ्यांमध्ये हे चौथी नेते आहे.
भाजप नेते मोहित कंबोज यांना मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लिन चीट - भाजप नेते मोहित कंबोज आर्थिक गुन्हे शाखा
आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल सी समरी ( Mohit Kamboj in cheating case ) रिपोर्ट दिला आहे. कथित बॅंक घोटाळा प्रकरणात मोहित कंबोज यांना पुर्णपणे ( Mumbai Police EOW clean cheat ) क्लीन चीट देण्यात आली आहे.

कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय पांडे यांच्याविरोधात आर्थिक घोटाळे बाहेर आले होते. त्यानंतर संजय पांडे यांनाच अटक झाली. कथित बँक घोटाळा प्रकरणात कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता क्लीन चीट मिळाल्यानं कंबोज यांची आर्म्स ॲक्ट अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमधूनही सुटका होणार आहे.
काय आहे प्रकरणबँकेचे कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मोहित कंबोज यांच्यासह त्यांच्या कंपनीतील दोन संचालकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. माहितीनुसार मोहित कंबोज यांच्या कंपनीने 2011 ते 2015 या कालावधीत इंडियन ओव्हरसीज बँकेकडून 52 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या बँकेची त्यांनी फसवणूक केली असून त्यांच्यावर कर्ज न फेडल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्जाची रक्कम ज्यासाठी घेतली होती त्यासाठी वापरली नसल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला.