मुंबई- दहिसर रेल्वे स्टेशनवर रेल्वेखाली येणाऱ्या एका वयोवृद्ध व्यक्तीचा जीव पोलीसाने वाचवल्याची घटना घडली आहे. एस बी निकम असे त्या पोलीस शिपायाचे नाव असून गणपत बिहार (वय 60) असे त्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सीसीटिव्हीत कैद झाला आहे.
अन् पोलिसाने 'त्या' वृद्ध व्यक्तीला मरणाच्या दारातून बाहेर काढलं..पाहा व्हिडिओ.. - dahisar news
सकाळी ६.३० दरम्यान गणपत प्लॅटफॉर्म क्रमांक ४ चा रेल्वे रुळ ओलांडत होते. मात्र, त्यावेळस त्यांच्या पायातला बूड रुळावर पडला. तो बूट ते परत घेऊन येत असताना अचानक समोरुन रेल्वे आली.
पोलीस शिपायाच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव
सकाळी ६.३० दरम्यान गणपत प्लॅटफॉर्म क्रमांक ४ चा रेल्वे रुळ ओलांडत होते. मात्र, त्यावेळस त्यांच्या पायातला बूड रुळावर पडला. तो बूट ते परत घेऊन येत असताना अचानक समोरुन रेल्वे आली. मात्र, तिथे कर्तव्यावर असणारे पोलीस शिपाई निकम यांची नजर गणपत यांच्यावर पडली आणि त्यांनी धावतच गणपत यांना वर ओढून घेतले. निकम यांच्या प्रसंगावधानामुळे गणपत यांचा जीव वाचला. त्यानंतर गणपत यांना दहिसर रेल्वे स्थानकात आणण्यात आले. आणि त्यांना त्यांच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आले.