महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vivek Phansalkar Interview तक्रारदार कोण, तक्रार कोणाविरुद्ध यापेक्षा तक्रार काय आहे हे पाहणे जास्त आवश्यक - विवेक फणसाळकर

मुंबई पोलीस दलाचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर ( Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar ) यांनी मुलीचे लग्न टाळून कर्तव्य बाजवले. त्यामुळे विवेक फणसाळकर ( Maha Vikas Aghadi Morcha In Mumbai ) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र विवेक फणसाळकर यांनी पोलीस दलात अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांच्यातील खमक्या अधिकाऱ्यामुळेच ( Vivek Phansalkar Interview On Various Issue ) मुंबईत नवीन वर्ष मुंबईकरांना आनंदात साजरे करता आले. त्यांच्या कार्याचा आढावा घेतला ईटीव्ही प्रतिनिधी पूनम अपराज यांनी.

Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar
मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर

By

Published : Jan 4, 2023, 8:09 PM IST

Updated : Jan 10, 2023, 5:52 PM IST

मुंबई -शहर पोलीस दलाचे आयुक्त विवेक फणसाळकर ( Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar ) यांनी आपल्या लेकीचे लग्न असतानाही अगोदर कर्तव्याला प्राधान्य देत महाविकास आघाडी मोर्चाचा ( Maha Vikas Aghadi Morcha In Mumbai ) बंदोबस्त संभाळला. त्यामुळे विवेक फणसाळकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र विवेक फणसाळकर ( Vivek Phansalkar Interview On Various Issue ) यांनी आजवर अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी पूनम अपराज यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकशाहीत तक्रारी येतात, मात्र तक्रारदार कोण, तक्रार कोणाविरोधात आहे, यापेक्षाही तक्रार काय आहे हे महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले.

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची विशेष मुलाखत

विवेक फणसाळकर यांनी पार पाडलेल्या जबाबदाऱ्या१९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या विवेक फणसळकर ( Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar ) यांनी आजवर अनेक महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी सांभाळली. मुंबई पोलीस आयुक्तपदी ( Mumbai Police Commissioner ) नेमणूक होण्यापूर्वी ते महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे संचालक होते. ठाणे पोलीस आयुक्तपदावरुन मे २०२१ मध्ये त्यांची या ठिकाणी बदली झाली. २०१६-१८ या कालावधीत फणसळकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून धुरा सांभाळली. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाचेही ( ATS Chief ) ते प्रमुख होते. मूळचे पुण्याचे असलेल्या फणसाळकर यांची अकोला येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक ही पहिली नेमणूक झाली होती. मुंबईच नव्हे तर प्रत्येक मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी चोखंदळपणे पार पडणारे मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी ईटीव्ही भारतशी वेगवेगळ्या विषयांवर बातचीत केली आहे.

मुंबई पोलीस दल शासकीय यंत्रणेचा शांतता राखण्यात हातभारथर्टी फर्स्टची रात्र निर्विघ्नपणे मुंबई पोलिसांच्या ( New Year Celebration In Mumbai ) सुरक्षेमुळे पार पडली. याबाबत विवेक फणसाळकर यांनी सांगितले की, यामध्ये संपूर्ण मुंबई पोलीस दल आणि इतर सर्व शासकीय यंत्रणा त्यांचा देखील फार मोठा हातभार आणि योगदान आहे. सर्व मुंबईकरांना मी धन्यवाद देऊ इच्छितो, कारण आम्ही दिलेल्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे आम्हाला कुठे त्यांच्याशी जोरजबरदस्ती करावी लागली नाही. खूप मोठ्या संख्येने मुंबईकर ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी बाहेर पडले होते. त्यातच दुसऱ्या दिवशी रविवार होता. आमच्या सर्व अधिकारी, अंमलदार यांना सूचना दिलेल्या होता की, लोकांच्या सणांमध्ये, उत्सवामध्ये बाधा आणायची नसते. ते कसे काय सुरक्षित साजरे होईल याकडे लक्ष देण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.

लेकीचं लग्न असताना बजावले कर्तव्यलेकीचे लग्न असताना विवेकी फणसाळकरांनी कर्तव्य श्रेष्ठ मानले. त्यामुळेच १७ डिसेंबरला पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या बंदोबस्तावर बारीक नजर ठेवली, चोख नियोजन केले, अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देत राहिले. मोर्चा संपन्न झाल्यावर त्यांनी लेकीच्या ( Vivek Phansalkar Daughter Marriage ) लग्नसोहळ्यात भाग घेऊन वधूवरांना आशीर्वाद देऊन, पै पाहुण्यांची आस्थेने विचारपूस करुन बापाचे कर्तव्य पार पाडले. त्याबाबत बोलताना फणसाळकर म्हणाले की, खरेतर समाजात अशी खूप लोकं आहेत. आमच्या पोलीस खात्यात पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस अधिकारी अनेक लोकं वैयक्तिक समारंभ असतात ते बाजूला ठेऊन काम करतात. त्यामुळे काही विशेष कौतुकास्पद नाही. पण मोर्चे चालू असतात. आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडले पाहिजे. सामान्य माणूस हाच प्रेरणास्थान असून मुंबईकर नेहमी झटत असतो. कामाच्या ठिकाणी जायला इतके तास लागतात त्याच्यानंतर परत घरी येणे आणि कष्ट करणे जे कष्टकरी आहेत हे खरंतर आपले प्रेरणास्थान आहेत. महाविकास आघाडीचा मोर्चा नियोजनानुसार पार पडला. महाविकास आघाडीच्या मोर्चेकरांचे त्यासाठी आभार मानतो. रोजचे आंदोलने, मोर्चे, धरणे हे लोकशाहीत अपेक्षित आहेत. तुम्हाला सांगायला मला अतिशय आनंद वाटतो की, गेल्या सहा महिन्यात ७०० हून अधिक आंदोलने, धरणे, मोर्चे मुंबईत झाले. मुंबई पोलिसांनी ते अतिशय चांगलेपणे हाताळले. ते सर्व शांततेत पार पडल्याचेही ते म्हणाले.

राजकीय नेत्यांचे आर्थिक गुन्हेराजकीय नेत्यांचे आर्थिक गुन्हे हे सध्या खूप उघड होत आहेत. या गुन्ह्यांचा तपास करताना राजकीय दबाव किती असतो, याबाबत बोलताना विवेक फणसाळकर यांनी सांगितले, पोलीस खाते म्हटले की तक्रारी येणार आणि तक्रारींचे स्वरूप वेगवेगळे असते. तक्रारी ज्यांच्या विरोधात असतात ते वेगवगळे असते, तक्रार करणारे वेगळे असतात. त्यामुळे तक्रार करणारे आणि तक्रार कोणाविरुद्ध यापेक्षा तक्रार काय आहे, त्यात तथ्य काय आहे हे पाहणे जास्त आवश्यक असते. त्याबाबतच्या कायद्यानुसार कारवाई होत असल्याचेही विवेक फणसाळकर यावेळी म्हणाले.

Last Updated : Jan 10, 2023, 5:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details