महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 6, 2019, 6:57 PM IST

ETV Bharat / state

मुंबई पोलिसांनी शेतकरी मोर्चावरुन 'आप'च्या धनंजय शिंदेंवर केला गुन्हा दाखल

पोलिसांनी आम आदमी पक्षाचे सचिव धनंजय शिंदे, प्रतिभा शिंदे व इतर सामाजिक कार्यकर्त्यांवर नोव्हेंबर 2018 मध्ये झालेल्या शेतकरी मोर्चामध्ये सहभागी असल्याबद्दल गुन्हे दाखल केले आहेत. आम आदमी पक्षाकडून या कृत्याचा बुधवारी पत्रकार परिषद घेऊन निषेध नोंदवण्यात आला. या अन्यायाविरोधात आप संविधानिक मार्गाने लढेल, असे सांगण्यात आले आहे.

आम आद्मी पक्षाचे सचिव धनंजय शिंदे

मुंबई -पोलिसांनी आम आदमी पक्षाचे सचिव धनंजय शिंदे, प्रतिभा शिंदे व इतर सामाजिक कार्यकर्त्यांवर नोव्हेंबर 2018 मध्ये झालेल्या शेतकरी मोर्चामध्ये सहभागी असल्याबद्दल गुन्हे दाखल केले आहेत. आम आदमी पक्षाकडून या कृत्याचा बुधवारी पत्रकार परिषद घेऊन निषेध नोंदवण्यात आला. या अन्यायाविरोधात आप संविधानिक मार्गाने लढेल, असे सांगण्यात आले आहे.

आम आद्मी पक्षाचे सचिव धनंजय शिंदेंची प्रतिक्रिया

हेही वाचा - राज्यपालांच्या भेटीनंतर खासदार डॉ. विकास महात्मे म्हणाले...फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील!

मुंबईतील मोर्चामध्ये तब्बल 10 हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेत स्वामिनाथन आयोग शिफारशींची अंमलबजावणी, कर्जमाफी व आदिवासीयांच्या जंगल जमीन हक्कांविषयी आवाज उठवला होता. एक वर्ष उलटून देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणत्याही लेखी अश्वासनांची पूर्तता न करता त्यांना केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप शिंदे यांनी यावेळी केला.

शिंदे म्हणाले, निवडणुका पार पडल्यानंतर मोर्चामध्ये सहभागी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. शेतकरी आंदोलनाची व त्यात सामील नेतृत्वाची गळचेपी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या गळचेपीला आंदोलक घाबरणार नसून शेतकऱ्यांचा न्यायासाठी आम आदमी पक्ष सर्व आंदोलकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. खोटे गुन्हे दाखल केले त्याचा निषेध करत याविरोधात संविधानिक मार्गाने लढून न्याय मिळवू, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत'च्या वृत्ताने टोल कंपनीला आली जाग; इंदूर पुणे मार्गावर डागडुजीला सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details