मुंबई :दहिसर पश्चिम मुंबई येथील सोन्याच्या कंपनीतून 95 ग्रॅम सोने घेऊन फरार झालेला सोनार काम करणाऱ्या दोन कारागीरास हावडा, पश्चिम बंगाल येथुन अटक करण्यास एमएचबी कॉलनी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 381 गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक आरोपींची नावे आरिफ सलीम शेख (29) आणि सलमान सुकूर शेख (29) अशी आहेत. हे दोघेही पश्चिम बंगाल येथील राहणारे आहेत.
दोन कारगीर झाले होते फरार : दहिसर पश्चिम मुंबई येथील सोन्याच्या कंपनीतून 95 ग्रॅम सोने घेऊन सोनार काम करणारे दोन कारागीर फरार झाले होते. याप्रकरणी सोने व्यवसायिक सोमनाथ मलिक यांनी एम एस बी कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संविधान कलम 381 अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे जोरदार फिरवली. मूळचे पश्चिम बंगाल येथील वर्धमान येथील असणारे आरिफ सलीम शेख आणि सलमान सुकुर शेख हे सोनारी काम करणारे कारागीर आहेत. हे दोन आरोपी पश्चिम बंगाल येथे लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
अशी केली चोरी : तक्रारदार सोमनाथ मल्लिक यांचा सोन्याचा कारखाना 139/बी वैशाली इंडस्ट्रीज,म्हात्रेवाडी रोड,बडोदा बँकेजवळ,दहीसर पश्चिम या ठिकाणी आहे. या सोन्याच्या कारखान्यात आरीफ सलीम शेख व इतर 17 नोकर हे कामास होते. ते सर्वजण दुकानातच झोपत. शुक्रवारी 28 फेब्रुवारीला आरीफ शेख वय 26 वर्षे हा सकाळी साडेआठ वाजता ते 8.50 वाजताचे दरम्यान कोणासही सशंय न येऊ देता अंगात निळा टी शर्ट व हाफ पँट घालुन पँटमध्ये सोन्याचे मणी घालुन कारखान्याच्या बाहेर निघुन गेला.
पोलिस निघाले होते आरोपींच्या शोधासाठी : तक्रारदार मल्लिक यांच्या तक्रारीवरून फरार आरोपीचा मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला. या मोबाईल नंबरबाबत तांत्रिक तपास करून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू झाले. 1 मार्चला दुपारी तीन वाजता आरोपीताचे मोबाईल लोकेशन अहमदाबाद येथील सापडले. तात्काळ एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्याचे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे ,पोलीस हवालदार प्रवीण जोपले व पोलीस शिपाई अर्जुन आहेर यांची टीम अहमदाबाद या ठिकाणी रवाना केली होती.