मुंबई : अटक करण्यात आलेला आरोपी मोईन शेख (35) पीडित मुलीच्या घरी गेला आणि कबीर शेख (25) हा फोन करून बोलवत असल्याचे सांगितले. परंतु मुलीने त्याच्यासोबत येण्यास नकार दिला. त्यानंतर मोईनने अल्पवयीन मुलीला धमकावले. नंतर मुलीला सोबत घेऊन गेला. त्यानंतर कबीर शेख याने माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि लग्न करायचे आहे असे म्हटले. मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर कबीरने तिला मारहाण करून बलात्कार केला. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे. मुलींच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
धमकावल्याने मुलगा घाबरली :एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 8 जानेवारी रोजी घडली होती. परंतु मुलगी घाबरली होती. त्यामुळे काहीकाळ काय करावे हे समजलेच नाही. तिला धमकावण्यात आले होते. मुलीने घडलेला प्रकार तिच्या पालकांना ४ फेब्रुवारीला सांगितला. त्यानंतर त्यांनी कबीर आणि मोईनविरुद्ध पोलिसांत तक्रारची नोंद केली आणि पोलिसांनी दोघांनाही अटक केली. पीडित मुलगी आणि दोन्ही आरोपी एकाच परिसरात राहतात. कबीरने त्या मुलीला अनेकवेळा सांगितले होते की, त्याला तिच्याशी लग्न करायचे आहे. पण मुलीने नेहमी नकार दिला होता.
मुलगी आई-वडिलांसोबत राहते :पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत राहते. मुलीचे आई-वडील दोघेही कामावर जातात. त्यामुळे तिच्याशी बोलण्यासाठी मुलगी घरी एकटी असल्याची ते वाट पाहत होते. आरोपी कबीरचे आधीच एक लग्न झाले आहे. त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली आणि दुसऱ्या लग्नातही काही वाद असल्याने दुसरी पत्नी त्याच्यासोबत राहत नाही. एन एम जोशी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी यांनी सांगितले की, आम्ही दोन्ही आरोपींना अटक केली आहे. ते सुपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत. पोलीस पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करत आहेत. पुढे अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने मुलीला धमकी दिली होती की, जर तिने घडलेल्या प्रकाराबद्दल कोणाला सांगितले तर तो सर्वांना त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू आहेत असे सांगेल.
पालघरमध्ये अशीच घटना :पालघरमध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या घटनेत पालघर तालुक्यातील माहीम येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर 8 जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणी 8 तरुणांना सातपाटी सागरी पोलिसांनी अटक केली आहे. पालघर तालुक्यातील सातपाटी सागरी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या माहीम चौकी दुर क्षेत्रातील पालघर- माहीम रस्त्यावरील पाणेरी नदीजवळ एका निर्जन ठिकाणी हा गुन्हा घडला होता.
हेही वाचा :Ratnagiri Crime : पत्रकार शशिकांत वारीशे अपघाती मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल; संशयित आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी