मुंबई -पोलिसांच्या गुन्ह शाखेने मुंबई शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुकानात घरफोडी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबईतील जोगेश्वरी परिसरात बांद्रा प्लॉट या ठिकाणी काही जण घरफोडी करण्यासाठी येणार असल्याची विश्वसनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. यामुळे पोलिसांनी सापळा रचून इब्राहिम, सुपियान मेहमूद शेख व इमरान वसीम खान या तीन आरोपीना अटक केली.
घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला मुंबईत अटक - Burglary gang
आरोपीनी मुंबईतील वाकोला पोलीस ठाणे, कुर्ला पोलीस ठाणे, जुहू पोलीस ठाणे व नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकानात घरफोडी केल्याचे पोलीस तपासात कबूल केले आहे. आतापर्यंत या आरोपींनी मुंबईतील पश्चिम उपनगर व पूर्व उपनगरात एकूण 35 घरफोड्या केल्या आहेत.
पोलीस तापासत हे आरोपी मुंबई, चेन्नई, केरळ शहरात फिरून तिथल्या दुकांनाची रेकी करत होते. दुकान किती वाजता बंद होते? दुकानात सीसीटीवी लावले आहेत का? पोलिसांची गस्त किती वेळ असते? या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच हे आरोपी दुकानात घरफोडी करत होते. मुंबई, चेन्नई व केरळ मधील काही दुकान घरफोडीच्या गुन्हयात या आरोपीना अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटून ही टोळी मुंबईत पुन्हा सक्रिय झाली होती.
या आरोपीनी मुंबईतील वाकोला पोलीस ठाणे, कुर्ला पोलीस ठाणे, जुहू पोलीस ठाणे व नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकानात घरफोडी केल्याचे पोलीस तापासत कबुल केले आहे. आता पर्यंत या आरोपीनी मुंबईतील पश्चिम उपनगर व पूर्व उपनगरात एकूण 35 घरफोड्या केल्या आहेत.