महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime: चेक बाऊन्स प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपीला केली २५ वर्षांनंतर अटक - चेक बाऊन्स प्रकरणी आरोपी

चेक बाऊन्स प्रकरणी 25 वर्षे फरार झालेल्या 62 वर्षीय आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गुजरातमधील भरूच येथून या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. रफी अहमद किडवई पोलीस ठाण्यात या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कॅमेरा कंपनीची फसवणूक केल्याप्रकाराने गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Mumbai Crime
62 वर्षीय आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली

By

Published : Feb 17, 2023, 1:07 PM IST

मुंबई :या प्रकरणात आरोपी 37 वर्षाचा असताना हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. या आरोपीने 40 कॅमेऱ्याच्या खरेदीवर एका कॅमेराच्या कंपनीला 50 हजारांचा चेक दिला होता. तो चेक बाउन्स झाल्यानंतर कॅमेरा कंपनीच्या मालकाने रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आले होते. नंतर आरोपीची जामीनावर सुटका झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.


25 वर्षे हा आरोपी फरार :जामीन मिळाल्यानंतर आरोपी कोर्टात सुनावणी दरम्यान गैरहजर राहत होता. काही दिवसांनी तो फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गेली 25 वर्षे हा आरोपी फरार झाला होता. अलीकडेच पोलिसांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली होती की, फरार आरोपी हा गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील अच्चोड येथे राहत आहे. नंतर मुंबई पोलिसांची टीम गुजरातमधील भरूच येथे दाखल झाली. त्यांनी गुजरात पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. अशा प्रकारे 25 वर्ष पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दडून बसलेल्या आरोपीला मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे.


नग्न अवस्थेत महिलेचा सोसायटीत वावर : मुंबईतील सांताक्रूझ येथील वाकोला पोलीस ठाण्यात निवासी संकुलातील सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी घरमालक आणि एका महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागच्या आठवड्यात ही महिला इमारतीच्या आवारात कपडे न घालता फिरताना आढळली होती. या प्रकाराचा फोटो समोर आला आहे. सांताक्रूझ येथील एका इमारतीमध्ये हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे. घरमालकाकडे आलेल्या महिला पाहुणीने हे कृत्य केले आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर कारवाई करण्यात आली होती.

मोबाईल विकत घेण्याच्या बहाण्याने केली फसवणूक :ओएलअक्सवर मोबाईलची जाहिरात पाहून मोबाईल लंपास केल्याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. या प्रकरणी भारतीय दंड संविधान कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक आरोपीचे नाव राजकमल तुळशीदार टांडीया होते. ही घटना २ फेब्रुवारी रोजी घडली होती. या घटनेबाबत तक्रारदार यांनी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भारतीय दंड संविधान कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अनोळखी इसमाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : Mumbai Crime News: मुंबईवर हल्ला करण्याविषयी फोनद्वारे खोटी माहिती; फेक कॉल करणाऱ्याला एका तासात अटक

ABOUT THE AUTHOR

...view details