मुंबई- बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध बँकांना चुना लावणाऱ्या २ आरोपींना मुंबई पोलिसांच्या मालमत्ता शाखेने अटक केली आहे. सुशांत प्रकाश आयरे (वय २९) आणि चेतन वावजीभाई कावा (वय ३६) असे दोन्ही आरोपींची नावे असून त्यांनी तब्बल १० बँकांना २ कोटी रुपयांचा चुना लावला आहे.
दहा बँकांना २ कोटींचा चुना; मुंबई पोलिसांकडून २ आरोपींना अटक
दोन्ही आरोपी शहरातील वेगवेगळ्या परिसरात भाड्याने घर घेऊन राहत होते. त्याच घराच्या करारपत्रावर पॅनकार्ड आणि आधारकार्ड बनवत होते. या आरोपींनी अशा प्रकारचे १७ गुन्हे केले असून तब्बल १० बँकांना २ कोटी रुपयांचा चुना लावला असल्याचे उघड झाले आहे.
आरोपी फेडरल बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ इंडियाचे एजंट म्हणून काम करीत होते. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही आरोपी बनवाट बँक स्टेटमेंट, बनावट पगाराच्या पावत्या यासह बनावट निवासी पट्टे दाखवून बँकांकडून परस्पर कर्ज घेत होते. तसेच त्यांनी वाहन कर्ज देखील काढले होते. या कर्जाचे सुरुवातीचे ३ हप्ते भरले. मात्र, पुढील हप्ते थांबल्यामुळे बँकेच्या प्रशासनाकडून या प्रकरणी अंतर्गत चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी बँकांची फसवणूक केल्याचे लक्षात आले. याप्रकरणी बँकांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
दोन्ही आरोपी शहरातील वेगवेगळ्या परिसरात भाड्याने घर घेऊन राहत होते. त्याच घराच्या करारपत्रावर पॅनकार्ड आणि आधारकार्ड बनवत होते. या आरोपींनी अशा प्रकारचे १७ गुन्हे केले असून तब्बल १० बँकांना २ कोटी रुपयांचा चुना लावला असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलीस अजून २ आरोपींचा शोध घेत आहेत.