महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टीआरपी घोटाळाप्रकरणी 12व्या आरोपीला अटक - TRP scam 12 ACCUSED ARRESTED

टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी बाराव्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव घनश्याम दिलीप कुमार सिंग असून त्याला ठाणे घोडबंदर रोड येथील ग्रीन एकर्स परिसरातून अटक करण्यात आलेली आहे.

TRP 12th accused arrested
टीआरपी घोटाळ्यासंदर्भातबाराव्या आरोपीला अटक

By

Published : Nov 10, 2020, 10:21 AM IST

मुंबई -टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून खुलासा करण्यात आल्यानंतर या संदर्भात मुंबई पोलिसांचे विशेष पथक तपास करत आहे. या घोटाळ्यात आतापर्यंत ११ आरोपींना अटक केली होती. आता मुंबई पोलिसांनी यातील बाराव्या आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव घनश्याम दिलीप कुमार सिंग असून त्याला ठाणे घोडबंदर रोड येथील ग्रीन एकर्स परिसरातून अटक करण्यात आली आहे.
टीआरपी वाढवण्यासाठी दिले होते पैसे
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा आरोपी रिपब्लिक वृत्तवाहिनीचा डिस्ट्रीब्यूटर हेड आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनी लोकांनी जास्त पाहावी यासाठी हंसा रिसर्च ग्रुपच्या काही कर्मचाऱ्यांसोबत मिळून त्याने पैसे देऊन वाहिनीचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी यासंदर्भात हा दावा केला आहे. या अगोदर घनश्याम सिंग याची मुंबई पोलिसांनी वारंवार चौकशी केली होती. रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या डिस्ट्रीब्यूशन संदर्भातील काही कागदपत्रांची मागणी करून ती तपासलीसुद्धा होती. यानंतरच्या तपासातील व इतर आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून घनश्याम सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. घनश्याम सिंह याला न्यायालयात मंगळवारी हजर केले जाणार आहे. मुंबई पोलिसांकडून त्याच्या पोलीस कस्टडीची मागणी करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details