मुंबई : टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेता पुनीत इस्सारबद्दल मोठी बातमी ( Puneet Issar email hacking case ) समोर आली आहे. एका व्यक्तीने पुनीत यांचे ईमेल खाते हॅक करून 13.76 लाख रुपये हडप करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी ( Oshiwara police cyber crime case ) आरोपीला अटक केली आहे.
काय प्रकरण आहे?ओशिवरा पोलिसांच्या सायबर सेलने ( Cyber Cell of Oshiwara Police ) अभिनेता पुनीत इस्सार यांचा इमेल आयडी हॅक करून त्याचे थिएटर बुकिंग रद्द करून 13 लाख 76 हजार रुपये त्याच्या स्वत:च्या खात्यात जमा करण्यास सांगणारा मेल पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. पुनीत इस्सार यांनी त्यांच्या जय श्रीराम ( Jay Shriram Drama ) या हिंदी नाटकासाठी एनसीपीए थिएटर ( NCPA theatre drama booking ) बुक केले होते. यासाठी त्यांना 13,76,400 रुपये देण्यात आले. पुनीत हे नाटक 14 आणि 15 जानेवारी 2023 रोजी सादर करणार होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या थिएटर प्रोडक्शन कंपनीच्या मेल आयडीवरून ( email ID of actor Puneet Issar ) बुकिंग केले होते. 22 नोव्हेंबर रोजी पुनीत इस्सार यांनी एनसीपीएला मेल करण्यासाठी त्यांचा मेल आयडी उघडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मेल आयडी उघडला नाही. यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठले.