मुंबई : देवनार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ( Deonar Police Station ) एक दिवसाच्या बालिकेची एक लाखांना विक्री होणार होती. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा डाव फसला आणि पोलिसांनी सुखरूप एक दिवसाच्या बालिकेची सुटका केली.
याप्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात जुवेनाईल जस्टिस ऍक्ट आणि भादवि कलम 374 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोन महिलांना अटक देखील करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी (Two women arrested for selling new born girl ) दिली.
डीसीपी संग्राम सिंह निशानदार
दोन महिलांना अटक :मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचचे डीसीपी संग्राम सिंह निशानदार यांनी माहिती दिली की, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष 6 चे पोलीस नाईक वानखेडे यांना माहिती मिळाली होती की, एक महिला एक दिवसाच्या बालकाची विक्री करण्यासाठी देवनार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार आहे.
त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या कक्ष 6ने सापळा रचून दोन महिलांना अटक ( Mumbai Police Arrest Two Women ) केली. यशस्वीरित्या एक दिवसाच्या बालिकेची सुखरूप सुटका ( Save one day baby girl )केली.