महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिला डान्सरचा बलात्कार करुन ७७ लाखांचे दागिने चोरणाऱ्याला अटक; मुंबई पोलिसांनी जयपूरमध्ये आवळल्या मुसक्या - Chhota Shakeel gang member tarik parvin news

मुंबईतील ओशिवरा परिसरात राहणाऱ्या एका डान्सरच्या घरात सोन्याच्या व हिऱ्यांच्या दागिन्यांची चोरी झाली होती. तब्बल 77 लाखांच्या दागिन्यांच्या चोरीचा तपास ओशिवरा पोलिसांकडून केला जात होता. या तपासादरम्यान पोलिसांनी सलमान जुबेर परवीन या आरोपीला अटक केली आहे.

Mumbai Police arrest nephew of Chhota Shakeel gang member tarik parvin aide in rape and theft case
महिला डान्सरचा बलात्कार आणि ७७ लाखांचे दागिने चोरणाऱ्याला अटक; मुंबई पोलिसांनी जयपूरमध्ये आवळल्या मुसळ्या

By

Published : Nov 3, 2020, 1:40 PM IST

मुंबई - ओशिवरा पोलिसांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील याचा हस्तक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारिक परवीन याच्या भाच्याला चोरी व बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली आहे. मुंबईतील ओशिवरा परिसरात राहणाऱ्या एका डान्सरच्या घरात सोन्याच्या व हिऱ्यांच्या दागिन्यांची चोरी झाली होती. तब्बल 77 लाखांच्या दागिन्यांच्या चोरीचा तपास ओशिवरा पोलिसांकडून केला जात होता. या तपासादरम्यान पोलिसांनी सलमान जुबेर परवीन या आरोपीला अटक केली आहे.

पार्टीत झाली ओळख, लग्नाचे दिले आमिष -
मुंबईतील एका पार्टीत पीडित डान्सरची ओळख आरोपी सलमान जुबेर परवीनसोबत झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाल्यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने सतत शारीरिक संबंध ठेवले असल्याचेही तक्रारदार महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. काही दिवसांसाठी कामानिमित्त घराबाहेर जायचे असल्याकारणाने पीडित तक्रारदाराने तिच्याकडील सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने हे घरातील सेट लॉकरमध्ये ठेवले होते. याची माहिती आरोपीला मिळाल्यानंतर त्याने पीडित तक्रारदाराच्या अनुपस्थितीत घरात सतत ये-जा ठेवली होती. या दरम्यान घरातील सेफ लॉकर चोरून त्याजागी तशाच प्रकारचे हुबेहूब दिसणारे सेफ लॉकर या आरोपीने आणून ठेवले होते.

अशी झाली चोरी उघड
आपले काम संपवून काही दिवसांनी तक्रारदार महिला मुंबईत आल्यानंतर तिने घरात असलेले सेफ लॉकर चावीने उघडण्याचा प्रयत्न केला असता सेफ लॉकर उघडत नसल्यामुळे घरात चोरी झाल्याचे तिच्या लक्षात आले. यासंदर्भात घरातील इतर मंडळींकडे चौकशी केल्यानंतर तिच्या अनुपस्थितीत आरोपी हा सतत तिच्या घरात येत जात होता व तिच्या बेडरुमचा वापर करत होता, असे त्यांनी सांगितले. यानंतर आरोपीला संपर्क साधण्याचा तक्रारदार महिलेने प्रयत्न केला असता त्याचा संपर्क होत नसल्यामुळे यासंदर्भात ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये तिने तक्रार दाखल केली.

असा लागला शोध...
चोरी केल्यानंतर सलमान परवीन याने मुंबईतून पलायन करून त्याच्याकडील मोबाईल फोन सोशल माध्यमांवरील अकाउंट बंद ठेवले होते. आपला ठावठिकाणा पोलिसांना लागू नये म्हणून तो सतत त्याचे राहण्याच्या ठिकाणी बदलत होता. लवकरच तो दुबईला पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांना हवा असलेला आरोपी जयपूरमध्ये असल्याची माहिती मिळाल्यावर या आरोपीला पोलिसांनी जयपूरमधून अटक करून त्याच्याकडून 77 लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले आहे. पोलीस चौकशीत त्याने अशाच प्रकारे बंगळुरूमध्ये एका महिलेला फसवले असल्याचे कबूल केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details