मुंबई- स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मुंबई पोलीस व मुंबई महानगरपालिका या दोघांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई शहरातील प्रत्येक वॉर्ड परिसरात महापालिका आणि पोलीस यंत्रणेमार्फत स्वच्छतेचा संदेश दिला जाणार आहे. मुंबईतील कचऱ्याचे वर्गीकरण आणि कचरामुक्त शहर करण्यासाठी महापालिका व मुंबई पोलीस यांनी संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे. याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याहस्ते सोमवारी मुंबई पोलीस कार्यालयात करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पोलीस विभागाच्या एएमबीआयएस (AMBIS) सिस्टमचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
महापालिकेसोबत मिळून मुंबई पोलीस देणार स्वच्छतेचा संदेश
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मुंबई पोलीस व मुंबई महानगरपालिका या दोघांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई शहरातील प्रत्येक वॉर्ड परिसरात महापालिका आणि पोलीस यंत्रणेमार्फत स्वच्छतेचा संदेश दिला जाणार आहे. मुंबईतील कचऱ्याचे वर्गीकरण आणि कचरामुक्त शहर करण्यासाठी महापालिका व मुंबई पोलीस यांनी संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे.
मुंबई
काय आहे MHA- AMBIS
महाराष्ट्र ऑटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टम सारखे डिजिटल तंत्रज्ञान वापरणारे मुंबई पोलीस खाते हे राज्यातील प्रथम पोलीस खाते ठरले आहे. या डिजिटल कार्यप्रणालीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींच्या बाबतीत सर्व डिजिटल माहिती एका क्लिकवर मुंबई पोलिसांच्या 94 पोलीस ठाण्यात उपलब्ध होणार आहे. यात आरोपींचे फिंगरप्रिंट, चेहरा ओळख यासह डोळ्यांच्या बुबुळ ओळखीवरून आरोपी सहज पोलिसांच्या हाती लागणार आहे.