मुंबई -अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबई शहरातील अमली पदार्थ तस्करावर धडक कारवाई केली आहे. यावर्षी जानेवारी ते जुलैपर्यंत केलेल्या कारवाईत, आतापर्यंत तब्बल १५ कोटींचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी दक्षिण आफ्रिकेतील मोझांबिक देशाचा नागरिक असलेल्या आणि नवी मुंबईत राहणाऱ्या बोनाव्हेचुर एंझुबेछुकु एनऊडे (३५) या आरोपीला अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी तब्बल 6 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे.
आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करावर कारवाई; आतापर्यंत १५ कोटींचे कोकेन जप्त - deputy police commissioner shivdip lande
दक्षिण आफ्रिकेतील मोझांबिक देशाचा नागरिक असलेल्या आणि नवी मुंबईत राहणाऱ्या बोनाव्हेचुर एंझुबेछुकु एनऊडे (३५) या आरोपीला अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी तब्बल 6 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे.
अटक केलेल्या आरोपींची पोलिस चौकशी केली असता, आरोपी आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा सदस्य असल्याची माहिती मिळाली आहे. आफ्रिकेतून भारतात येणारे कोकेन सुरुवातीला दिल्लीमध्ये आणले जाते आणि त्यानंतर मुंबई व आजूबाजूच्या परिसरात वितरीत करण्याचे काम हा आरोपी करत होता. याबरोबरच अमली पदार्थ विरोधी पथकाने जानेवारी २०१९ मध्ये केलेल्या कारवाईमध्ये जॉन फ्रान्सिस व इजिके या दोन आफ्रिकन अमली पदार्थ तस्करांना अटक केली होती. त्यांच्याकडून ६ कोटी ३ लाखांचे कोकेन जप्त केले होते. तसेच २४ मे रोजी केलेल्या कारवाईत अमली पदार्थविरोधी पथकाने डेविड ओल आणि तुबुलाई या केनियन नागरिकांना अटक करून त्यांच्याकडून तीन कोटी रुपयांचे कोकेन जप्त केलेले आहे. अशी माहिती अमली पदार्थ विरोधी पथक पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिली.