मुंबई- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विविध उपाय योजना प्रशासकीय स्तरावर केले जात आहेत. मुंबई पोलिसांकडून कलम 144 शहरात लागू करण्यात आलेला असून संचारबंदी कायम करण्यात आलेली आहे. मात्र, नियम मोडणाऱ्या 2 हजार 581 जणांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
ही कारवाई 20 मार्च ते 6 एप्रिल या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्या 173 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तब्बल 387 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे तर 1 हजार 958 आरोपींना जामिनावर पोलिसांनी सोडण्यात आले आहे.